महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, राजू वाघमारे आणि संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आणखी एक बडा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले हे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Congress l मुश्ताक अंतुले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार :

मुश्ताक अंतुले हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. कोकण विभागात त्यांचं मोठं वर्चस्व आहे. मात्र त्यांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. मुश्ताक अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार आहेत. तसेच गेली 40 वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता एमसीए लाउन्ज, गरवारे क्लब, वानखडे स्टेडियम मुंबई येथे हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाट चालत आहे असे सुनील तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Congress l पक्ष सोडण्यामागे कारण काय? :

काँग्रेसचे दिग्गज नेते मुश्ताक अंतुले यांचं पक्ष सोडण्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये अंतुले पक्ष का सोडणार आहेत याचा उल्लेख केलेला नाही. तसेच मुश्ताक अंतुले यांच्याकडून देखील काही कारण आलेलं नाही.

अंतुले यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. तसेच कोकणात निवडणुकीचा प्रचार देखील जोरात सुरू आहे. हा प्रचार सुरू असतानाच आता कोकणातील अजितदादा गटाचं बळ वाढणार असल्याचं दिसत आहे.

News Title- another congress leader leaves the party

महत्त्वाच्या बातम्या- 

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”