“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. आदित्यला मुख्यमंत्री पद देऊन दिल्लीला जाण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा विचार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा दावा फेटाळून लावला. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांवर टीका केलीये.

“हे सर्व काही खरं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांना दिल्लीला जाण्याची स्वप्न पडू लागली. मोदीजींच्या जागेवर मी जाईल असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यांना आधी गृहमंत्री पदाचं स्वप्न पडलं. त्यांच्या या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे फडणवीस यांचे पंख छाटण्यात आले. म्हणूनच फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं,” असं राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

“मोदींना मागे टाकून पंतप्रधान बनेल”

मी पंतप्रधान बननार. माझं इतकं राजकीय वजन वाढलंय की मी योगी आणि मोदींना मागे टाकून पंतप्रधान बनेल. असं त्यांना वाटत होतं. मात्र मोदी आणि शहा यांनी त्यांचे पंख छाटून त्यांना राज्यात बसवलं असल्याचा दावा आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तेव्हा आदित्यने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, आदित्यला आपण चांगला तयार करू. त्याला अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री करू. त्यावेळी मी या गोष्टीला विरोध केला. आदित्य लहान आहे. त्याच्या डोक्यात हे घालू नका. जर आदित्यला मुख्यमंत्री केलं तर तुम्ही कसं त्याच्या हाताखाली काम करणार? तेव्हा फडणवीस म्हणाले मी दिल्लीला जणार आहे. मला अर्थ खात्यातलं कळतं. “याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थमंत्री बनण्यात रस होता”, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

याप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आमचे जूने मित्र उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत. त्यांना वेड लागलं आहे, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

News Title – Sanjay Raut On Devendra Fadanvis Statement

महत्त्वाच्या बातम्या- 

‘रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या त्या…’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

मोठी बातमी! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग

…तर उन्हामुळे होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

‘नवनीत राणांचा पती रवी राणामुळे…’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

एका मिनिटासाठी 1 कोटी मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री; आलिया, दीपिकालाही टाकलं मागे