‘नवनीत राणांचा पती रवी राणामुळे…’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachchu Kadu | प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा (Navneet Rana) यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यावर बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अमरावतीत बच्चू कडू यांनी महायुतीलाच आव्हान दिलं आहे. त्यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. तर आनंदराज आंबेडकर हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांना वंचित आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. तसेच महाविकास आघाडीकडून येथे बळवंत वानखेडे यांना तिकीट देण्यात आलंय.

नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावरून निवडणूक लढवत आहेत. पण, अमरावतीत बच्चू कडू यांनी महायुतीचं टेंशन वाढलं आहे. युतीत असूनही त्यांनी राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केलाय. इतकंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून ते सतत काही न काही मुद्यावरून नवनीत राणा यांच्यावर प्रहार करत आहेत. अशात बच्चू कडू यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

‘आमचा उमेदवार दिनेश बूब हा माणूस रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. रवी राणांनी इतक्या व्यक्तिगत पातळीवर खाली जाऊन आमच्या उमेदवारावर आरोप करू नये. ज्याचं घर मातीचं आहे, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल.’, असा दावा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे.

‘नवनीत राणाच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेयही रवी राणांना जाईल. रवी राणा व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती,’ असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

नवनीत राणा यांच्यासाठी घेतलेल्या सभेत रवी राणा यांनी बच्चू कडू यांचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिनेश बुब हे दुपारी 12 वाजता झोपेतून उठतात. नंतर ग्लासवर ग्लास सुरू होतात. रात्री जुगार खेळतात अशा उमेदवाराला मतदान करू नका, असं रवी राणा म्हणाले होते. त्यावर आज बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत हा मोठा दावा केला. ते आज मीडियाशी संवाद सांधत होते.

बच्चू कडू महायुतीत आहे की नाही?

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना अजून एक सवाल केला. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या रॅलीत सर्वच मित्र पक्षांची नावे घेतली. तुमचं नाव नाही घेतलं. तुम्ही युतीत आहे की नाही?, असा सवाल केला असता बच्चू कडू म्हणाले की, बरं झालं फडणवीस यांनी मित्र पक्षाच्या यादीत आमचं नाव घेतलं नाही. त्यांनी नाव घेतलं असतं तर संभ्रम निर्माण झाला असता. त्यांनी आमचं नाव नाही घेतलं याचा अर्थ फडणवीस आमच्या बाजूने आहेत.

News Title : Ravi Rana will be the reason behind Navneet Rana defeat in Amarawati says Bachchu Kadu

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

’23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला 4 जागा मिळणं ही शोकांतिका’; अमोल कोल्हेंची खोचक टीका

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

ऐश्वर्या-अभिषेकमधील वाद संपले?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

अमित शाह फडणवीसांना म्हणाले; 2 मोठी माणसं बोलत आहेत त्यामुळे तू बाहेर बस!