’23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला 4 जागा मिळणं ही शोकांतिका’; अमोल कोल्हेंची खोचक टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. शरद पवार आणि अजित पवार असे हे दोन गट आहेत. आता लोकसभा निवडणुकीमुळे दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यातील वाद सतत चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे.

अमोल कोल्हे आणि अजित पवार एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकून आल्या. यावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

‘हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणं स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व एकेकाळी 23 जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या आता चार जागा मिळतात. ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे.’, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सर्व्हे मध्ये अजित पवारांना ज्या चार जागा भाजपने देऊ केल्या आहेत त्या चारही जागा मिळत नसल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यातच त्यांच्या पक्षातील नाराजी अशी पक्षाच्या बाहेर येत असेल तर ही लोकसभा निवडणुक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूकीत संभ्रम निर्माण करणारी ठरू शकते, असंही कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले आहेत.

अजित पवारांवर कोल्हे यांची टीका

यावेळी कोल्हे यांनी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव यांच्यावरही टीका केली. आढळराव पाटील यांनी ही माजी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य. करत मतदारांना भावनिक साद घातली. यावर माध्यम प्रतिनिधींनी अमोल कोल्हे यांना सवाल केला.

त्यावर अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले की, ‘ही लोकसभेची निवडणूक आहे. कोणाची पहिली निवडणूक की शेवटची नाही. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या वयाचा मान ठेवत मी त्यांना एवढंच सांगेल की आपण देशाचं बोलूयात, जनेतेच बोलूयात.’

News Titlle : Amol Kolhe Criticism on Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात