राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra News Weather Update | महाराष्ट्रात काही भागात अवकाळी पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आता हवामान विभागाने काही जिल्ह्यांना आज (21 एप्रिल) यलो अलर्ट जारी केला आहे. आज राज्यात काही ठिकाणी गारपीटीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि ठाण्यात वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

‘या’ भागांना यलो अलर्ट

हवामान विभागाकडून पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यासोबतच देशभरात मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते.

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काल रात्री मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर येथे वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. आजही मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

News Title : Maharashtra News Weather Update 

महत्त्वाच्या बातम्या –

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात