‘त्या’ दोन शब्दांमुळे निवडणूक आयोगाची नोटीस; उद्धव ठाकरेंचं थेट आयोगाला आव्हान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. मुंबईतीन अनेक जागांसाठी उद्धव ठाकरे झटत आहेत. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि मशाल चिन्ह दिलं गेलं. यानंतर नुकतंच ठाकरे गटाने त्यांचं मशाल गीत लाँच केलं. त्या मशाल चिन्हाच्या गीतात हिंदू धर्म आणि जय भवानीचा उल्लेख केलाय. या दोन शब्दांमुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निवडणूक आयोगाने धर्माच्या नावाचा उल्लेख होत असल्याने नोटीस बजावली आहे.

“ते दोन शब्द काढणार नाही”

यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कडाडले आहेत. गीतामध्ये जय भवानी हा शब्द आम्ही काढणार नाही. कारण जय भवानी हा शब्द आमची अस्मिता आहे. आम्ही आमच्या अस्मितेची तडजोड करणार नाही. तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आधी मोदी-शहांना अटक करा मग आमच्यावर कारवाई करा असं म्हणत ठाकरी भाषेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कडाडले आहेत.

निवडणूक आयोगाची नोटीस आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि इतर दोन राज्याच्या निवडणुकीला भाजपने धार्मिक प्रचार केला होता. त्यावेळी अमित शहा यांनी रामलल्लाचं दर्शन घडवून आणू असं आश्वासन देऊन त्यांनी प्रचार केला. त्यावेळी आम्ही मोदी आणि अमित शहा यांच्या प्रचारावेळी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. मोदी आणि अमित शहा धर्माचा आधार घेत प्रचार करत होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी केली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

“…तरच आमच्यावर कारवाई करा”

निवडणूक आयोगाने मोदी आणि अमित शहा यांच्यावरील कारवाईनंतर आम्हाला कळवलं नाही. त्यामुळे आम्ही आयोगाला स्मरणपत्र लिहिलं होतं. त्यालाही उत्तर आलं नाही. आम्हाला नोटीस पाठवून आमच्या मशाल गीतातून निवडणूक आयोगाने हरकत घेतली आहे. गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलं. आधी मोदी आणि शहांवर कारवाई करा मग आमच्यावर कारवाई करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज देशात आणि राज्यामध्ये हिंदू सरकार आहे असं म्हणतात. त्यांचे चाकर म्हणून निवडणूक आयोग काम करत आहेत. आम्हाला निवडणूक आयोगाने हिंदू धर्म हा शब्द हटण्यात आला आहे. हे राज्यकर्त्यांना मान्य आहे का?, असा सवालही त्यांनी केलाय.

News Title – Uddhav Thackeray Say First Take Action Against Narendra Modi And Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

’23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला 4 जागा मिळणं ही शोकांतिका’; अमोल कोल्हेंची खोचक टीका

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

ऐश्वर्या-अभिषेकमधील वाद संपले?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

अमित शाह फडणवीसांना म्हणाले; 2 मोठी माणसं बोलत आहेत त्यामुळे तू बाहेर बस!

“लोकसभेच्या नादात राम सातपुतेंची आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली”