“लोकसभेच्या नादात राम सातपुतेंची आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amit Deshmukh | काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. त्या सोलापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते अमित देशमुख आणि सतेज पाटील यांनी कासेगाव येथे जाहीर सभा घेतली. या सभेत अमित देशमुख यांनी चौफेर फटकेबाजी करत भाजपवर निशाणा साधला.

‘लोकसभा उमेदवारीच्या नादात आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली. आता बीडचे पार्सल पुन्हा बीडला पाठवा’, अशी खोचक टीका अमित देशमुख यांनी सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर केली आहे. ते विधिमंडळात होते पण खासदारकीला उभा राहिले आणि आता खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली. अशा शब्दांत अमित देशमुख यांनी टोलेबाजी केली आहे.

अमित देशमुख यांची सातपुते यांच्यावर टीका

राम सातपुते हे भाजपचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचा सामना कॉँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे सोलपुर लोकसभा मतदारसंघातील प्रचारही आता वेग धरु लागला आहे. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. त्यामुळे सध्या भाजप आणि कॉँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.

प्रणिती शिंदे यांना बीआरएसमध्ये गेलेले नेते भगीरथ भालके यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यानंतर पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस नेते प्रकाश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. याच सभेत अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी राम सातपुते यांच्यावर टीका केली.

“ज्याला उमेदवारी अर्ज भरता येत नाही, तो..”

आमदार सतेज पाटील यांनीही राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला. सतेज पाटील यांनी सातपुते यांच्यावर शेरेबाजी करताना हा जबरदस्तीने उभा केलेला उमेदवार आहे असा टोला लगावला. जो उमेदवार स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सही करायचा विसरतो तो तुमचे भले काय करणार ?, असंही ते म्हणाले.

ज्याला आपला उमेदवारी अर्ज भरता येत नाही, जो आपल्या अर्जावर सही विसरतो तो तुमच्या भविष्यकाळातील विकासावर काय सही करणार?,उमेदवारी अर्ज भरता येत नाही आणि लाखांच्या बाता केय जातात, असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.

News Title – Amit Deshmukh on Ram Satpute

महत्त्वाच्या बातम्या-

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर