“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha | बारामती लोकसभा (Baramati Loksabha) निवडणुकीला काही दिवस उरले आहेत. दोन्ही गटाकडून प्रचारास सुरूवात झाली. काल बारामती येथील कन्हेरी गावातून सुप्रिया सुळे यांनी प्रचाराला सुरूवात केली. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांआधी (18 एप्रिल) अर्ज दाखल केला. त्यानंतर सभांचा धडाका सुरू झाला. बारामतीच्या राजकारणात अनेक ट्वीस्ट निर्माण होत आहेत. नणंद विरूद्ध अशी लढाई होणार आहे. मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असं शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य. तसेच या वक्तव्यावर सुनेत्रा पवार भावूक झाल्या. बारामतीच्या राजकारणात अनेक राजकीय नाट्य घडलं. बारामतीच्या प्रचारसभेत अजित पवार यांनी सर्वकाही अपसूकपणे मांडलं. (Baramati Loksabha)

बारामतीच्या सभेमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी तोफ डागली आहे. पुतण्या, काकी, काकासह पवार कुटुंबातील सर्वांचीच अजित पवार यांनी खरडपट्टी काढली. सर्व साहेबांनी केलं. मग मागील गेल्या 30-35 वर्षात आम्ही काय केलं?, असा सवाल आता अजित पवार यांनी सभेत बोलत असताना केलाय. बारामतीच्या विकास कामावर आणि राजकीय जडणघडणीवर भाष्य केलंय. सुप्रिया सुळे यांच्या विवाहापासून ते स्वत:चा विवाह होण्यापर्यंत त्यांनी घडलेलं सर्वच सांगितलं. (Baramati Loksabha)

साहेब त्यावेळी राजकारण सोडणार होते. राजकारण सोडून पुन्हा काटेवाडीला जातो असं बोलले असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यावेळी अजित पवार बोलत असताना ते राजकारणात कसे आले हे देखील सांगितलं.

“घास घास घासायची अन्…”

मी म्हटलं मुलाला निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या. त्यांना वाईट वाटलं. मी देवेंद्रजी आणि एकनाथजी दिल्लीला जातो. आम्ही इकडं गेल्याने आमची मोदींजींसोबत ओळख झाली. आमच्या अंबानी-अदानीसोबत ओळखी झाल्या. यापूर्वी आमच्या ओळखी नसायच्या. आम्ही घास घास घासायचं अन् यांनी केलं यांनी केलं असं व्हायचं, असं अजित पवार यांनी सांगितलं. (Baramati Loksabha)

“अजित पवार हे कार्यसम्राट”

शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलंय. सभेमध्ये बोलत असताना विजय शिवतारे म्हणाले “व्यापक हितासाठी मी निवडणूक न लढवण्याचं ठरवलं. बारामतीच्या निवडणुकीला भावनिक केलं जातय. मात्र अजित पवार हे कार्यसम्राट नेते आहेत. लोकांसाठी झटनारे नेते आहेत, असं विजय शिवतारे म्हणालेत.

News Title – Baramati Loksabha An Ajit pawar Aggressive on Pawar Family

महत्त्वाच्या बातम्या

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसानं घातला धुमाकूळ; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

सुनील तटकरेंची डोकेदुखी वाढली, दुसऱ्या सुनील तटकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, त्यांनी बारामतीत… रोहित पवारांनी सांगितली भाजपची चाल