सुनील तटकरेंची डोकेदुखी वाढली, दुसऱ्या सुनील तटकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raigad Loksabha | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. यंदाची निवडणूक अनेक कारणाने चर्चेत आलीये. राजकीय वर्तुळात अनेक ट्वीस्ट निर्माण झाले. दुसरीकडे रायगड लोकसभा मतदारसंघात एकाच नावाचे इतर दोन उमेदवार असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना रायगड जागेवर उमेदवारी देण्यात आली. मात्र आता रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना आणखी एका सुनील तटकरे यांनी आव्हान दिलं आहे. एकसारखी नावं असल्याने सुनील तटकरेंची मतं दुसरे सुनील तटकरे खातील अशी शक्यता आहे.

एकाच नावाचे दोन उमेदवार असल्याने यंदा रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चर्चा आहे. 1991 पासून सेम नावाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघात राजकीय रणधुमाळी जोरत आहे. 15 ते 19 एप्रिल दरम्यान 30 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 20 एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख आहे. (Raigad Loksabha)

रायगड मतदारसंघात सुनील तटकरे विरूद्ध सुनील तटकरे

रायगड लोकसभा मतदारसंघ, अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, शेकाप यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते अनंत गीते आणि महायुतीचे नेते सुनील तटकरे यांच्यात थेट लढत होणार आहे.

1991 पासून सेम नाव असलेले अनेक उमेदवार

सेम नाव असल्याने अनेकदा मतांवर परिणाम झालेला पाहायला मिळतो. 1991 पासून समान नाव असलेले अनेक उमेदवार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे त्यांना अनेकदा फायदा झाला आहे. एकसारखं नाव असल्याने मतांवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो.

अॅड दत्ता पाटील आणि ए. आर अंतुले यांनी समान नाव असणाऱ्या उमेदवारांसोबत निवडणूक लढवली. याचा परिणाम हा त्यांच्या मतांवर झाला होता.

News Title – Raigad Loksabha An NCP Candidate Sunil Tatkare Vs Other Sunil Tatkare

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाळ्यात घामाघूम झाल्याने अंगाला दुर्गंधी येतेय?, मग ‘या’ टिप्स वापरुन पाहा

भाजपसोबत जाऊन अजित पवारांची फरफट, फक्त दोनच जागांवर स्वतःचे उमेदवार

माढ्याचा तिढा सुटल्यानंतर ‘या’ नेत्याला शरद पवारांचं मोठं गिफ्ट, केली मोठी घोषणा

उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पीत असाल तर सावधान, तज्ज्ञांचा मोठा इशारा

भाजपकडून भीती दाखवली जातेय!, अजित पवार गटाच्या नेत्याचे धक्कादायक आरोप