माढ्याचा तिढा सुटल्यानंतर ‘या’ नेत्याला शरद पवारांचं मोठं गिफ्ट, केली मोठी घोषणा

Jayant Patil announced Madha Vidhan Sabha candidature to Uttam Jankar

Jayant Patil | माढा लोकसभा मतदारसंघ या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला. येथे भाजपला मोठं खिंडार पडलं. प्रथमच मोहिते पाटलांचं संपूर्ण घराणंं सोडून गेल्याने भाजपला मोठा धक्का बसला. उमेदवारी न मिळाल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार गटात प्रवेश केला. आता माढ्यात शरद पवार गटाचे उमेदवार मोहिते पाटील यांचा सामना भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्याशी होणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न सपशेल फोल ठरले. बंडखोरीविरोधात भाजपने मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. पण जानकर यांचा विश्वास संपादन करण्यात शरद पवार गटाला यश मिळालंय.

माळशीरसमधील मोहिते पाटील घराणे आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यातील 30 वर्षांचं वैर संपुष्टात आलं आहे. जानकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. इतकंच नाही तर, जानकर यांनी मोहिते पाटील यांना समर्थन दिलंय. धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देत उत्तम जानकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

माढ्यात मोहिते-जानकर यांची युती

माढ्यात जयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करीत तुतारी हाती घेतली. आता त्यांना जानकर यांचाही पाठिंबा मिळालाय. पण जानकर यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील शंका न संपल्याने त्यांनी थेट जयंत पाटील यांच्यासमोरच जयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या नेत्याच्या राजकीय भविष्याबद्दल जाब विचारला. तेव्हा या गोष्टी सभेत बोलायच्या नसतात असं सांगून जयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

मोहिते आणि जानकर यांची युती झाली असली तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यास वेळ जाणार, असं चित्र दिसत असतानाच जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मध्यस्थी करत मोठं वक्तव्य केलं. झालं असं की, भाषणात जयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर यांना मदत करण्याबाबत कोणतंही स्पष्ट वक्तव्य न केल्याने जानकर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यातच जयसिंह मोहिते पाटील यांनी थेट उत्तमरावाची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल केला.

उत्तम जानकर यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर

यानंतर जयंत पाटील यांनी मध्यस्थी करुन उमेदवारीची घोषणाच केली. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभेची उमेदवारी देणारा मीच आहे आणि तुम्ही सांगत असाल तर आताच त्यांना विधानसभेचा AB फॉर्म देतो, असं म्हटलं. त्यामुळे एकप्रकारे शरद पवारांकडून उत्तम जानकरांना मोठं गिफ्टच मिळाल्याचं दिसून येतंय.

तसंच पुढे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, मला उत्तम जानकर यांचे कौतुक करावेसे वाटते. अनेक प्रलोभने समोर असताना, अनेक आश्वासने समोर असताना त्यांनी माळशिरसच्या जनतेसोबत राहण्याचा व स्वाभिमानाने विधानसभेत पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मोहिते पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेऊन तालुक्याचा विकास करण्याचा मानस केला आहे. मला खात्री होती जानकर योग्य भूमिका घेतील. दिल्लीसमोर आम्ही झुकत नाही. तुम्ही कितीही विमानं पाठवली तरी आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही, हे जानकर यांनी दाखवून दिलंय.

News Title : Jayant Patil announced Madha Vidhan Sabha candidature to Uttam Jankar

महत्त्वाच्या बातम्या –

आज कोणाचं वर्चस्व राहणार? सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार लढत

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .