विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

School Holiday l उन्हाळा लागला की विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची चाहूल लागते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा संपायची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना सुट्ट्या कधी लागणार आहेत, यासंदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार शाळांना सुट्ट्या :

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात माहिती दिली आहे की, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यामध्ये ही माहिती दिली आहे.

शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2024-25 हे 15 जूनपासून सुरु होणार आहे. परंतु शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तब्बल 1 महिना सुट्ट्या असणार आहेत.

School Holiday l विदर्भातील शाळा 15 जूनपासून सुरु होणार :

शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकवाक्यता, सुसंगती राहण्यासाठी उन्हाळी सुट्टी, शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांना 2 मे 2024 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार काही उपक्रम सुरू असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत.

पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा 15 जून 2024 पासून सुरु होणार आहेत. कारण जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

News Title – School Summer Vacation Date Announced 

महत्त्वाच्या बातम्या – 

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे