3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nilesh Lanke l लोकसभा निवडणुकीच्या मैदानात मोठ्या उलाढाली होताना दिसत आहे. सगळेच नेतेमंडळी आपल्या विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदनगर मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विद्यमान आमदार निलेश लंके यांच्यामध्ये लढत होणार आहे.

Nilesh Lanke l शरद पवारांनी केला गौप्यस्फोट :

अशातच आता राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आमच्या विरोधात आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका. दुसरा कोणताही उमेदवार आम्हाला चालेल,’ असा निरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका उद्योजकांमार्फत आपल्याला पाठविला होता,’ असा थेट उल्लेख शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी नगर शहरात आयोजित सभेला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी लंकेच्या प्रचार सभेला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवा नेते आदित्य ठाकरे, भूषणसिंह होळकर, आमदार रोहित पवार उपस्थित होते.

तीन अक्षरी आडनावाचे उद्योजक आमच्याकडे आले होते : शरद पवार

या प्रचार सभेत शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे कौतुक केले आहे. यावर पवार म्हणाले की, ‘उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असताना एक तीन अक्षरी आडनावाचे उद्योजक आमच्याकडे आले होते. त्यांनी आपण राज्याच्या महसूल मंत्र्यांकडून आल्याचे सांगितले होते. आमचे आणि मंत्र्यांचे संबंध चांगले असतात. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे निरोप दिला आहे की, नगरला त्यांच्या विरोधात लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या. यावरून निलेश लंके यांची किती धास्ती विरोधकांनी घेतली आहे लक्षात येत आहे. तसेच संसदेत बोलताना देखील भाषेची अडचण येत नाही. त्यामुळे सामान्यांची भाषा येत असलेले निलेश लंके तुमचे प्रश्न तेथे मांडून सोडवून घेऊ शकतील असे शरद पवार म्हणाले आहेत.

तसेच यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘महसूल मंत्र्यांच्या खासदार पुत्राने आपल्या काळात काम देखील केले नाही. त्यावरून होणारी टीका टाळण्यासाठी अध्यक्ष शरद पवार आणि माझ्यावर वारंवार टीका केली जात आहे. मात्र विद्यमान खासदारांनी आधी कामाचा हिशोब द्यावा. त्यांच्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देत राहणार आहोत. मात्र त्यासाठी तुमची साथ हवी आहे असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

News Title – Sharad Pawar Statement On Nilesh Lanke

महत्त्वाच्या बातम्या – 

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे

भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे फेकली वस्तू, नेमकं काय घडलं?

नाची, डान्सर, बबली म्हणणाऱ्या राऊतांना नवनीत राणांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…