नाची, डान्सर, बबली म्हणणाऱ्या राऊतांना नवनीत राणांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Navneet Rana | अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे बळवंत वानखेडे उमेदवार आहेत. नुकतीच ठाकरे गटाची सभा झाली. त्यासभेमध्ये संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात खालच्या शब्दात टीका केली. याचा आता नवनीत राणा यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

“टीका करण्याआगोदर आपल्या पत्नीकडे…”

नवनीत राणा म्हणाल्या की, कोण आहेत संजय राऊत? सीतेला पण भोग चुकले नाहीत. आपण तर राजकारणात आहात. संजय राऊत यांनी ज्या मुलीचं कन्यादान केलं. ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिचा तरी विचार करायला पाहिजे. माझ्यावर टीका करण्याआगोदर आपल्या पत्नीकडे पाहायला हवं होतं. एखादी माहिली बाहेर पडून काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही. अमरावतीची मी सून आहे, असं नवनीत राणा म्हणाल्यात. त्यानंतर आता रवी राणा यांनी देखील संजय राऊत यांच्यावर हल्ला केला.

“संजय राऊत सुन ले मेरी बात तू…”

ते म्हणाले की, “संजय राऊत अमरावतीत येऊन गेला. त्याने नवनीत राणा यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. संजय राऊत आता जनाब संजय राऊत झाला आहे. जनाब संजय राऊत सुन ले मेरी बात तू, अमरावतीत येऊन तू नवनीत राणा यांना गाडण्याची भाषा केली. ही अमरावती आहे. तुझ्यासारखे 56 गाडण्याची ताकद आहे.”

नवनीत राणा यांच्यावर ज्या भाषेमध्ये टीका केली. त्या तुमच्या मुलीच्या वयाच्या आहेत. 14 दिवस तुरूंगात असूनही पोट भरलं नाही. वरून तुम्ही गाडण्याची भाषा करत आहात. नवनीत राणा आता हिंदू शेरणी आहे, असं नवनीत राणा म्हणाल्यात.

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना संधी दिली आहे. “बळवंत वानखेडे यांची लढाई नाचीशी नाही, डान्सरशी नाही, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरूद्ध महाराष्ट्राशी आहे. ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार यांच्याशी आहे, तर ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधींशी आहे,” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं.

News Title – Navneet Rana Replied To Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

मला मूल असण्याची गरज वाटत नाही, कारण… अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं वक्तव्य चर्चेत

भाजपला पराभवाची धास्ती!, जे लीड देणार नाहीत त्यांना… थेट आमदारांना मिळाली तंबी

पुण्यात दारुचा पूर, अबब!!! पुणेकरांनी वर्षभरात रिचवली 14 कोटी लिटर दारु

मला शक्तिप्रदर्शनाची अजिबात गरज नाही!, नारायण राणेंनी सांगितलं कारण

Yamaha ने लाँच केली चावीशिवाय सुरू होणारी स्कुटर; जाणून घ्या किंमत