मला मूल असण्याची गरज वाटत नाही, कारण… अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं वक्तव्य चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prarthana Behere | मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी अनेकदा चर्चेत असते. मराठी मनोरंजन विश्वामध्ये तिनं मोठ्या पडद्यापासून कामाला सुरूवात केली. त्यानंतर तिनं मराठा मालिकांमध्ये काम करायला सुरूवात केली. अभिनेत्री प्रार्थनाने (Prarthana Behere) काही दिवसांआधी मुंबई सोडली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. अशात पुन्हा एकदा प्रार्थना बेहरे चर्चेत आली आहे. तिला एका मुलाखतीमध्ये बाळाबद्दल विचारलं त्यावर तिनं उत्तर दिलं. (Prarthana Behere)

प्रार्थनाने (Prarthana Behere) सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करिब या कार्यक्रमामध्ये मुलाखत देत असताना प्रार्थनाला लग्नानंतर बाळाबद्दल विचारलं. त्यावर तिनं आपल्याला मुल नको असल्याचं सांगितलं. मूल का नको त्यावर तिने उत्तर दिलंय. तसेच नुकतंच प्रार्थनाने मुंबई शहर सोडलं आहे. त्याबाबतही तिनं उत्तर दिलं आहे. तिने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे.

प्रार्थनाला मुल का नको?

प्रार्थनाला मुलाखतीत बोलत असताना तिच्या बाळाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर प्रार्थनाने बाळ नको असल्याचं उत्तर दिलं. मुल का नको? असं विचारल्यानंतर प्रार्थना म्हणाली, तिथे तिच्या घरामध्ये भरपूर प्राणी आहेत. तिच्या नवऱ्याला प्राण्यांची भरपूर आवड आहे. यामुळे आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं, यावेळी प्रार्थना म्हणाली. आम्ही प्राण्यांची मुलांप्रमाणे काळजी घेतो, असं प्रार्थना म्हणाली.

प्रार्थनाने मुंबई का सोडली?

प्रार्थनाने मुंबई का सोडली?, असा प्रश्न अभिनेत्रीला करण्यात आला. त्यावेळी ती म्हाणाली की, आम्ही कोविडच्या काळात तिथंच रहायचो. कोविडच्या आधी ती जागा घेतली होती. कोविडच्या दरम्यान ठरवलं की ती जागा आता डेव्हलप करायची. आलिबागवरून प्रवास करणं सोपं आहे. आमचं तिथं घोडे, गाई, कुत्रे असं सगळं आहे. आठवड्यातले 4 दिवस तिथं जावं लागायचं. जोपर्यंत मालिकेचं शुटींग सुरू होतं, तोपर्यंत मी मुंबईतच होते, असं तिने सांगितलं.

आलिबागला गेल्यावर मला तिथे राहायला खूप आवडायचं. तिथे हिरवळ आणि मोठी जागा आणि तिथे गेल्यावर मी तिथली होऊन जाते. मी तिथे जाऊन पेंटींग करते, मला आवडतं. सगळ्या गोष्टी मी तिथे करते. त्यामुळे आपल्याला वाटलं की आपण इथं कायमचं राहायला येऊया, असंही प्रार्थनाने सांगितलं.

News Title – Prarthana Behere Do Not Want A child Entertainment News

महत्त्वाच्या बातम्या

माझी बदनामी व्हायला नको असं वाटत असेल तर लीड द्या!, अशोक चव्हाणांची कळकळीची विनंती

मोठी बातमी! ठाकरे गटातील ‘या’ बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

“कोणी धमकी देत असेल तर मला फोन करा”, सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन

होता रोहित म्हणून नाहीतर… हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स हारता हारता वाचली!

माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार