भाजपला पराभवाची धास्ती!, जे लीड देणार नाहीत त्यांना… थेट आमदारांना मिळाली तंबी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP | पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यामध्ये भाजपने (BJP) ‘मिशन 45 प्लस’ अधिकच मनावर घेतलं आहे. इतर मित्र पक्षांना भाजपने (BJP) कमी जागा देत बहुतांश जागा आपल्या पारड्यात टाकल्या आहेत. असं असलं तरीही भाजपला (BJP) सध्या राज्यामध्ये पराभवाची धास्ती लागली आहे. कारण भाजपचे जे आमदार लीड देणार नाहीत त्यांच्या आमदारकीचं तिकीट कापण्यात येणार असल्याची तंबी भाजपने (BJP) आपल्या आमदारांना दिलीये. यावरूनच भाजपला आपल्या पराभवाची धास्ती लागलीये.

जो आमदार आपल्या मतदारसंघातून अधिक लीड मिळवून देईल त्याची उमेदवारी सुरक्षित राहिल. राजकारणात एकाच पक्षातील नेत्यांचे एकमेकांसोबत मतभेद असतात. मात्र उमेदवाराचे आणि आमदाराचे मतभेद असले तरीही त्यांनी आपला उमेदवार लीडने निवडून देण्याची तंबी भाजपने आमदारांना दिलीये.

‘मिशन 45 प्लस’

राज्यामध्ये सध्या नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेला सुरूवात केली आहे. ‘मिशन 45 प्लस’ गांभिर्याने घेतलं असून दिग्गज नेते कामाला लागलेत. भाजपने आपल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून लीड देणं बंधनकारक केलंय.

ज्याची कामगिरी चांगली त्यालाच तिकीट

भाजपने आपल्या आमदारांना नुसतं टार्गेट दिलं नाहीतर आता त्याचं रिपोर्ट कार्ड देखील तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये मताधिक्याचा उमेदवाराला कसा फायदा झाला हे पाहण्यात येणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना आणि इच्छूक उमेदवारांना तशा सूचना दिल्यात. आमदारकीचं स्वप्न पाहायचं असेल तर आतापासून जोमाने सुरूवात करावी लागणार आहे. ज्याची कामगिरी चांगली त्याला तिकीट देण्यात येणार असल्याचं भाजपचं धोरण आहे.

भाजपने राज्यातील 48 जागांपैकी 40 हून अधिक जागा जिंकण्याचं धोरण भाजपने आखलं असून त्या दृष्टीने प्रयत्न केलेत. भाजपने अधिक जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं. तर त्यानंतर अजित पवार यांना सोबत घेतलं आणि आता राज ठाकरे यांना सोबत घेतलं.

News Tittle – BJP Policy Give Lead And Get MLA Ticket Otherwise Will Not think About Vidhansabha

महत्त्वाच्या बातम्या

माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार

आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, भाजपच्या सभेत शिवसैनिकांनी घातला राडा

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर