बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, भाजपच्या सभेत शिवसैनिकांनी घातला राडा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mihir Kotecha | लोकसभा निवडणूकामुळे देशासह राज्यातही मिरवणुका, प्रचारसभांचा धडाडा सुरू आहे. आज (19 एप्रिल) मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. राज्यात जागावाटपवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच अजून एक घटना घडल्यामुळे तणाव वाढला आहे.

झालं असं की, ईशान्य मुंबईतील भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, या मेळाव्यात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे मुंबईत भाजपा आणि शिंदे गटात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिंदे गटात तणाव

महायुतीच्या या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित होते. सभाच्या ठिकाणी मोठे बॅनर्सही लावण्यात आले होते. पण, या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिंदे गटातील कार्यकर्ते चांगलेच संतापले.

भांडुप या भागात शिवसेनेचा चांगला प्रभाव आहे. येथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. असं असताना सभेतील बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो न लावण्याची चूक भाजपाला चांगलीच महागात पडली. त्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले.

संतापलेल्या शिवसैनिकांची घोषणाबाजी

सभा सुरू असतानाच शिंदे गटाचे माजी आमदार अशोक पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला. उपस्थित भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपली नाराजी जाहीर केली.

भाजपा नेते शेलार भाषण करत असतानाच अशोक पाटील हे व्यासपीठावर गेले आणि तिथे जाऊन त्यांनी सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली. यामुळे सभेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. संतापलेल्या शिवसैनिकांची मिहीर कोटेचा (Mihir Kotecha ) यांच्या सभेत आशिष शेलारांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी केली.यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

News Title: Activists of Shinde group aggressive in BJP leader Mihir Kotecha sabha in mumbai

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल