तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Crime | पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असलेलं पुणे शहर हे आता गुन्हेगारांचं शहर म्हणून ओळखलं जातंय. कोयता गँगची सध्या पुणे शहरामध्ये चर्चा आहे. तरूणींवर कोयत्याने हल्ला झाल्याच्या अनेक धक्कादायक घडामोडी पुणे शहरात घडल्यात. अशा तीन घटना पुणे शहरात घडल्यात. (Pune Crime)

सिंहगड येथे भुमकर चौकात काडीपेटीवरून वाद झाला त्यातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हा गोळीबार 18 एप्रिलला सकाळी पहाटे अडीचच्या सुमारास करण्यात आला. काडीपेटी मागण्याच्या कारणावरून हा गोळीबार झाला. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव हे गणेश गायकवाड आहे. पुण्यात (Pune Crime) तीन दिवसात तीन गोळीबार करण्यात आले. (Pune Crime)

बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

पुणे शहरात जंगली महाराज रोडवर धीरज आरगडे या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवर आलेल्या हेल्मेट घातलेल्या दोन्ही अज्ञातांनी फायरींग केली हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. त्याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

हडपसर येथे दोन सैनिकांमध्ये वाद झाला आणि गोळीबार झाला. याप्रकरणात जयवंत खलाटे जखमी झाले असून सुधीर रामचंद्र शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या दोन घटनेनंतर पुणे सिंहगड रोड येथे भुमकर चौकामध्ये काडीपेटी देण्याच्या प्रकरणातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

काडीपेटी देण्याच्या प्रकरणातून गोळीबार

पुणे शहरातील सिंहगड रोड येथे भुमकर चौकात पहाटे अडीचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. काडीपेटी मागण्याच्या प्रकरणातून ही घटना घडली आहे. गणेश गायकवाड असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. पुण्यातील गोळीबार प्रकरणी ही आजची तिसरी घटना आहे. याआधी कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर कोयता गँगचा मास्टरमाईंड अविनाश धनवे यांच्यावर देखील गोळीबार झाला होता.

News Title – Pune Crime News Update

महत्त्वाच्या बातम्या

16 वर्षाच्या भाच्यावर आला आत्याचा जीव, प्रकरण कोर्टात जाताच आला आत्याला हादरवून टाकणारा निकाल

अखेर ठरलं… शिंदे गटाचं एक पाऊल मागे, नारायण राणेंची उमेदवारी जाहीर

सलमान खान गोळीबार प्रकरणाला नवं वळण!

पुढील 5 ते 7 दिवस… हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पावसाचा इशारा

घरी आलेल्या मैत्रिणीला दिलं गुंगीचं औषध आणि त्यानंतर मैत्रिणीच्या भावानेच…