अखेर ठरलं… शिंदे गटाचं एक पाऊल मागे, नारायण राणेंची उमेदवारी जाहीर

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) शिंदे गटाने माघार घेतली. तर नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) उमेदवारी जाहीर झाली. भाजपकडून नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शेवटी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागली. शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) दावा केला होता, मात्र आता शिंदे गटाने माघार घेतली आहे. यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर?

भाजपच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची तेरावी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव नमूद करण्यात आलं. यादी जाहीर करण्याआधी उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यास पाठिंबा देऊ, असं वक्तव्य केलं. त्यामुळे शिंदे गटाने अप्रत्यक्षपणे माघार घेतली.

उदय सामंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत. त्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय. यामुळे आता भाजपकडून नारायण राणे विरूद्ध विनायक राऊत, अशी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

शिंदे गटाची माघार

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी उदय सामंत यांनी ताकद लावली. उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. मात्र नारायण राणे यांनी निवडणूक लढवण्याबाबत निर्धार केला. शेवटी उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून माघार घेतली. त्यानंतर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा पेच मिटला. या मतदारसंघातून भाजप विरूद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळत होता. शिंदे गटातून किरण सामंत यांना संधी देण्यात आली होती. तर दुसरीकडे नारायण राणे देखील लढण्यास इच्छूक होते. मात्र किरण सामंत यांनी काही दिवसांआधी मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे माघार घेत असल्याचं सांगत, सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. तो संदेश त्यांनी वॉट्सअॅपच्या माध्यमातून पोहोचवला आणि त्यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर आता नारायण राणे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

News Title- Ratnagiri Sindhudurg Lok Sabha In Narayan Rane Official Candidate From BJP Party

महत्त्वाच्या बातम्या