16 वर्षाच्या भाच्यावर आला आत्याचा जीव, प्रकरण कोर्टात जाताच आला आत्याला हादरवून टाकणारा निकाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Crime News | आत्या आणि भाचा या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. 5 मुलांची आई असलेल्या आत्याने भाच्यासोबत संबंध ठेवल्याने पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावर कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर सर्वत्र याचीच चर्चा होतेय.

पॉक्सो कोर्टाने 16 वर्षीय भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आत्याला वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे .पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश अर्चना सागर यांनी या दोषी आत्याला 10 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे.

आत्याने भाच्यासोबत ठेवले संबंध

सदरील घटना डेहराडून येथे घडली आहे. 5 जुलै 2022 रोजी 16 वर्षीय मुलाच्या आईने या घटनेबाबत बसंत विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपी महिला पतीपासून वेगळं आपल्या माहेरी राहत होती. त्यांच्यात मतभेद असल्याने ती गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती.

याच दरम्यान या महिलेने आपल्या सावत्र भाच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ती भाच्याला घेऊन गायबही झाली होती. पण परतली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. ही महिला तेव्हा गरोदर होती. या प्रकरणी गुन्हा दाखल (Crime News) करत पोलिसांनी आरोपी आत्याला 9 जुलै 2022 रोजी अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली.

महिलेला वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा

गरोदर असल्यामुळे या महिलेला कोर्टाने 2 जानेवारी 2023 रोजी कोर्टाने जामीन मंजूर केला. तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर नवजात मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली असता ती पीडित मुलाशी जुळली. पुढे न्यायालयात ट्रायलसाठी आलेल्या या मुलाने जाहीर कबुली देत सांगितलं की, आपण आत्यासोबत संमतीने संबंध ठेवले.

मुलाच्या या जबाबानंतरही कोर्टाने या आत्याला वीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. घटनेच्या वेळी तो 18 वर्षांचा होता, असं त्याने सांगितलं. महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली नसल्याचंही त्याने सांगितलं होतं. मुख्य पीडिताने आरोप फेटाळले असतानाही न्यायालयाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे निकाल दिला. घटनेच्या वेळी त्याचं वय 16 वर्षे असल्याचं सिद्ध झाल्याने कोर्टाने आत्यावर वॉरंट जारी करून शिक्षा (Crime News) भोगण्यासाठी तुरुंगात पाठवलं.

News Title – Crime News Woman jailed 20 years who get pregnant from her nephew

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपची धाकधूक वाढली; ‘हे’ दोन मतदारसंघ जिंकणं कठीण

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?