भाजपची धाकधूक वाढली; ‘हे’ दोन मतदारसंघ जिंकणं कठीण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chandrakant Patil | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी चिंता व्यक्त केली. माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपला विजयासाठी कठीण आहे. तर सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणं अवघड असल्याचं वक्तव्य स्वत: चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केलं आहे. यामुळे आता माढा आणि सोलापूरमध्ये भाजपची धाकधूक वाढली आहे.

माढ्यात भाजपचा उमेदवार अडचणीत?

माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे भाजपचा उमेदवार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. सर्व्हेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. सर्व्हेमुळे महायुतीच्या नेत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सोलापूरची जागा थोडी जिंकण कठीण आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघाची जागा आणखी कठीण असल्याची चिंता चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कमाला लागा अशी सूचना केलीये. चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर मतदारसंघातील मंगळवेढा शहरात आमदार समाधान आवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची भेट घेतली.

“माढ्याची निवडणूक कठीण नव्हती पण आता…”

माढ्याची निवडणूक याआधी कठीण नव्हती, मात्र आता कठीण झाली आहे, सोलापूरची निवडणूक अधिक कठीण नाही, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलं आहे. सोलापूर येथे भाजपचे राम सातपुते आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. तर माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे.

सर्व्हे काहीही सांगो, महायुतीतील 45 हून कमी जागा मिळणार नाही. ज्या तीन जागा अडचणीच्या आहेत त्यादेखील मिळवायचा प्रयत्न करू, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली नाही, म्हणून ते नाराज होते. त्याऐवजी भाजपचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांना संधी दिली आहे. यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये आले. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीेये. भाजपचा नेता आपल्याकडे वळवण्यासाठी शरद पवार हे यशस्वी ठरले आहेत.

News Title – Chandrakant Patil Statement About Madha And Solapur Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या

…तर तुतारी वाजवून टाका!; भाजप उमेदवार सुजय विखेंच्या आवाहनामुळे नगरमध्ये एकच खळबळ

अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ मतदारसंघातून लढण्याची केली घोषणा

“वाढपी वाढतोय म्हणजे..”, राजेंद्र पवार अजित पवारांवर संतापले

काळजी घ्या! ‘या’ शहरात 10 वर्षानंतर सर्वाधिक तापमान

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा अपघात, फोटो आला समोर