अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ मतदारसंघातून लढण्याची केली घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhijeet Bichukale | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर काही जागांवर अर्ज भरणं बाकी आहे. अशातच सातारा लोकसभा मतदारसंघाचा महायुतीकडून गुंता सुटत नव्हता. मात्र भाजप नेते उदयनराजे भोसले यांना भाजपने साताऱ्यातून उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, याच सातारा लोकसभा मतदारसंघातून अभिनेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसेच त्यांनी शरद पवार, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे.

अभिजीत बिचुकले सातारा लोकसभा लढणार-

अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतात.  बिग बॉस फेम म्हणून अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची ओळख असून ते आता पुन्हा एकदा सातारा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामं करायची हे देखील सांगितलं आहे.  2004, 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला तसाच या निवडणुकीत पाठिंबा द्या, असं आवाहन अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी केलंय.

मी निवडणूक अर्ज दाखल केला असून मतदार राजा जागृत राहिला पाहिजे, असं अभिजीत बिचुकले म्हणालेत. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही, असं म्हणत अभिजीत बिचुकले यांनी राजकारण्यांना टोला लगावला आहे. येत्या 19 एप्रिल रोजी अभिजीत बिचुकले सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरणार आहे.

उदयनराजेंबद्दल अभिजीत बिचुकले म्हणाले…

उदयनराजेंबद्दल अभिजीत बिचुकले म्हणाले, “उदयन दादांची भाजपमधून निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण झाली. मात्र भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याबाबत उदयनराजे आणि लोकांनी पाहावं “,असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संसद भवन उभारण्याची मागणी मी केली होती. समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. पाच वर्षांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं पण स्मारकाची एकही विट रचली गेली नाही,” असं अभिजीत बिचुकले म्हणालेत.

“शरद पवार आणि उदयनराजे यांचे हाडवैर आहे. वेळ आली की मी त्यांच्यावर बोलणार”, असल्याचं देखील अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

News Title – Abhijeet Bichukale Satara Lok Sabha Election News Update

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ विभागात इतक्या पदांसाठी भरती सुरू

‘हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर काढेन…’, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा

“नितीन गडकरींसारखा भ्रष्टाचारी कोणी नाही”, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

“पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी EVM मध्ये कचाकचा बटण दाबा”

भाजपच्या बड्या नेत्याचा भयानक अपघात; प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर