‘हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर काढेन…’, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा

Amol Kolhe | अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. शरद पवार आणि अजित पवार असे हे दोन गट आहेत. आता लोकसभा निवडणुकीमुळे दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लावले जात आहेत. अशात खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यातील वाद सतत चव्हाट्यावर येताना दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे?, असा सवाल करत कोल्हे राजीनामा द्यायला निघाले होते. त्यांना मीच थांबवलं होतं, असा दावा केला होता. त्यावर कोल्हे यांनीही जागीच प्रत्युत्तर दिलं.

‘5 वर्षांच्या पैलवानाची कुस्ती, 20 वर्षाच्या पैलवानाशी..’

‘ज्याला नटसम्राट म्हणवता, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला. मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटीसम्राट, खोकेसम्राट असलेलं चांगलं.’, असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना डिवचलं होतं. आता कोल्हे यांनी पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे.

शिरूर लोकसभेत कोल्हे यांचा जनसंपर्क नाही, असा प्रश्न राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव आणि महायुतीचे नेते सतत करत आहेत. यालाच आता अमोल कोल्हे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आता गावागावात जत्रा सुरुयेत. जत्रेत कुस्ती लावायची झाली तर, पाच वर्षाच्या मुलाची आणि 20 वर्षाच्या मुलाची कुस्ती लावायची, लावली पाहिजे ना?, लावायची का नाही लावायची? नाय लावायची का, मग 20 वर्षाच्या जनसंपर्काची आणि पाच वर्षांच्या जनसंपर्काशी तुलना कशी करायची?’, असा सवाल करत कोल्हे  (Amol Kolhe) यांनी अजित पवारांना टोला हाणला.

‘खेडची जनता ती जखम कधीच..’

’20 वर्षांचा जनसंपर्क आणि पाच वर्षांचा जनसंपर्क याची तुलना करून दिशाभूल केली जाते. पण, ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या लोकसभेची निवडणूक असते, ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवाता, ते काम करताना अवघ्या पाच वर्षातील कामगिरी तुमच्या 15 वर्षांपेक्षा उज्ज्वल आहे, हे मात्र तुम्ही सांगत नाही.’, असंही कोल्हे म्हणाले आहेत.

तुम्हाला आता 15 वर्षे झालीत. पण, इथे एक तरी मोठा प्रकल्प तुम्ही शिरुर लोकसभा मतदारसंघात आणला का याचं एकदा तरी उत्तर द्या. खेडची जनता विमानतळाची जखम कधीच विसरू शकत नाही. अजून तर सुरुवात आहे, हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर काढेन, असा इशाराच कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिला आहे.

News Titlle : Amol Kolhe target Ajit Pawar on Election

महत्त्वाच्या बातम्या-

कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांची संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल

लोकसभेच्या रिंगणात वंचितचा लढा कुणाविरोधात?, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

ऐश्वर्याने उरकलं दुसरं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

गुड न्यूज; गुंतवणूकदारांचे पैसे होणार दुप्पट

नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी