नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Car Tips l प्रत्येक तरुणाचं स्वतःची कार असावी असं स्वप्न असत. मात्र कित्येकदा तरुणवर्ग कार खरेदी करूनही कारची व्यवस्थित काळजी घेत नाही. त्यामुळे नवीन कार असूनही लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशापरीस्थीत नवीन कार खरेदी केल्यास नेमकी काय काळजी घ्यावी हे माहिती असणे गरजेचं आहे.

Car Tips l जास्त वेगाने कार चालवू नका :

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कार खरेदी करता तेव्हा ती वेगाने चालवू नये. कार नवीन असल्याने आणि तुम्हीही पहिल्यांदाच कार चालवत असाल तर अंदाज येणे कठीण जाते. अशापरिस्थितीत दुसऱ्या वाहनाला धडकण्याचा धोकाही वाढतो. याशिवाय नवीन कार असल्याने कार समजून घेण्यासाठी देखील थोडा वेळ लागतो. त्यामुळे जास्त वेगाने गाडी न चालवण्याचा प्रयत्न करावा.

जास्त वजन टाळा :

नवीन कार खरेदी केल्यानंतर काही लोक खूप जास्त सामान घेऊन प्रवास करतात किंवा त्यांच्या कारने जेवढे प्रवासी नेऊ शकतात त्यापेक्षा जास्त प्रवासी असतात. असे जर जास्त काळ केले तर फायद्याऐवजी नुकसानीचा धोका वाढतो. काही परिस्थितींमध्ये इंजिनवर भार असतो आणि मायलेज कमी होते. त्यामुळे कारमध्ये जास्त वजन ठेवणे टाळावे.

Car Tips l टायर्सची काळजी घ्या :

पहिल्यांदा कार खरेदी करणारे अनेकदा कारच्या टायर्सकडे लक्ष देत नाहीत. असे केल्याने टायरचे दीर्घकाळ नुकसान होते. कार खरेदी केल्यानंतर टायरमध्ये हवेचा दाब योग्य प्रमाणात असावा. तसे न झाल्यास मायलेजवर विपरित परिणाम होतो.

कार वेळेवर सर्व्हिस करा :

जर कोणतीही कार दीर्घकाळ कोणत्याही समस्यांशिवाय वापरायची असेल तर ती नेहमी वेळेवर सर्व्हिस करावी. पण पहिल्यांदा कार खरेदी करणारे अनेकदा कारच्या सेवेबाबत बेफिकीर असतात. वेळेवर सेवा न मिळाल्याने इंजिन ऑइल खराब होते आणि कधी कधी ते जळल्यामुळेही कमी होते. याशिवाय इंजिनच्या आतही घाण साचते त्यामुळे नंतर समस्या निर्माण होतात.

News Title – New Car Tips In Marathi

महत्त्वाच्या बातम्या –

विराटच्या चाहत्यांनो RCB ‘या’ वर्षी IPL ट्रॉफी जिंकणार

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज