अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election 2024 l सर्वत्र लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच एका मराठी वृत्तवाहिनीने ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या सर्वेमध्ये धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Lok Sabha Election 2024 l अजित पवार गटाला बसणार मोठा धक्का :

या जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र समोर येत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता येणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता या सर्व्हमुळे अजित पवार गटाचं चांगलच टेन्शन वाढलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांमध्ये महायुतीत अजित पवार यांच्या वाट्याला आतापर्यंत अवघ्या चार जागा आल्या मिळाल्या आहेत. नाशिकच्या जागेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. मात्र अद्यापही या जागेचा तिढा सुटलेला नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती येथील ताकद वाढवण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीची जागा सोडली आहे. पण त्याचा देखील अजित पवारांना फायदा होत नसल्याचं दिसत आहे. कारण सर्व्हेच्या अंदाजानुसार, बारामती मतदार संघामध्ये सध्या सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं दिसत आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांचा पराभव होण्याची दाट शक्यता सर्वेमधून वर्तवण्यात आली आहे.

पाहुयात कोणता पक्ष कुठे बाजी मारणार :

बारामतीमध्ये कोण बाजी मारणार? :

बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचं पारडं जड असल्याचं सर्वेमधून दिसत आहे.

रायगडमध्ये कोण बाजी मारणार? :

रायगडमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनंत गिते यांचं पारडं जड असल्याचं चित्र समोर येत आहे.

धाराशिवमध्ये कोण बाजी मारणार? :

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांचं पारड जड असल्याचं सर्व्हेत दिसत आहे.

नाशिकमध्ये कोण बाजी मारणार? :

नाशिकमध्ये महायुतीला विजय मिळेल असा अंदाज सर्व्हेतुन समोर येत आहे.

शिरुरमध्ये कोण बाजी मारणार? :

शिरुरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे बाजी मारणार असल्याचं सर्वेमधून स्पष्ट होत आहे.

Lok Sabha Election 2024 l महाराष्ट्रातील सर्व्हेचा अंदाज काय?

महायुती – 30

महाविकास आघाडी –18
———–
एकूण = 48

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

भाजप = 21/22
शिवसेना (एकनाथ शिंदे) – 9/10
राष्ट्रवादी (अजित पवार ) – 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 9
राष्ट्रवादी (शरद पवार) – 5
काँग्रेस – 3
———–
एकूण = 48

News Title – Lok Sabha Election 2024 Opinion Poll

महत्त्वाच्या बातम्या

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू

“बिश्नोईला आम्ही खतम करू”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

“4 दिवस सासूचे संपले आता सूनेचे 4 दिवस येऊ द्या”

‘सांगलीत शेवटच्या क्षणी काँग्रेसचा…’; विश्वजीत कदमांचं मोठं वक्तव्य

‘बापासारखं मला…’; भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात पाणी