“4 दिवस सासूचे संपले आता सूनेचे 4 दिवस येऊ द्या”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भाऊजय लढत होणार आहे. केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाकडे लागलं आहे. दोन्ही गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या येत्या 18 तारखेला निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून रंगत निर्माण होताना दिसतेय. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केला. “4 दिवस सासूचे संपले तर सूनेचे 4 दिवस येऊ द्या”, असा टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला आहे. (Baramati Lok Sabha)

काही दिवसांआधी शरद पवार यांनी बाहेरून आलेले पवार आणि मूळचे पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. मी असं काही बोललो नसल्याचं ते म्हणालेत. यावर आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. (Baramati Lok Sabha)

“40 वर्षे झाली तरीही बाहेरची”

“ही वडिलधारी जरा जुना काळ आठवत असेल, तर त्यांना म्हणावं की जुना काळ थोडा बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपले, आता सूनेचे चार दिवस येऊ द्या. की फक्त सासू सासू सासू. सुनेनं फक्त काय बघत बसायचं का? बाहेरची-बाहेरची-बाहेरची असं कुठं असतं का राव? आपण त्यांच्याकडे घरची लक्ष्मी म्हणून बघतो. 40 वर्षे झाली तरीही बाहेरची, किती वर्षे झाले घरची? असा सवाल आता त्यांनी उपस्थित केला. सांगा आई बहिणींनो, बघा बाबा आता”, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला.

शरद पवार यांचं स्पष्टीकरण

“मी तसं बोललो नव्हतो. पत्रकाराने सांगितलं अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्याभाषणामध्ये सांगितलं की जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं. ताईला निवडून दिलं. आता सूनेला निवडून द्या. यापुढे त्यांनी आणखी एक वाक्य वापरलं. त्यासंबंधीत मी स्पष्टीकरण दिलं,” असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

अजित पवार यांनी आपल्यासोबत 40 आमदार घेत बंड केलं आणि सत्तेत विराजमान झाले. यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आपात्रतेच्या सुनावणीचे आदेश देण्यास सांगितले.

विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणात सुनावणी घेतली. त्यांनी देखील अजित पवार गटाला दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. असं असताना लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार विरूद्ध पवार, अशी लढत पाहायला मिळणार आहे.

News Title – Baramati Lok Sabha Ajit Pawar Aggressive On Sharad Pawar Of That Statement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी यंत्रणेद्वारे शिवसेनेचा प्रचार, बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

राज्यात उष्णतेची लाट; राज ठाकरेंनी सरकारला केलं महत्त्वाचं आवाहन

अभिनेत्रीचं अनोखं फोटोशूट, सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात अजून एक पवार, अजितदादांचं टेंशन वाढलं

मुंबईच्या पराभवानंतर बुमराहची फॅन मोमेंट, धोनीला पाहून म्हणाला…