राज्यात उष्णतेची लाट; राज ठाकरेंनी सरकारला केलं महत्त्वाचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | राज्यातील तापमान उन्हाळ्यामुळे अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला आणि जनतेला महत्त्वाचं आवाहन केलंय. त्यांनी एक ट्वीट करत उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासामुळे लहान मुलांच्या शाळांना सुट्टी देण्याचं आवाहन केलंय. तसेच प्राण्यांना आणि पक्षांना पाणी मागता येत नाही, म्हणून त्याची तजवीज करत पक्षांसाठी गॅलेरीत पाणी ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

राज ठाकरे यांचं ट्वीट जसंच्या तसं

“सस्नेह जय महाराष्ट्र, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी.” (Raj Thackeray)

“पक्षांसाठी गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा”

“तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलेरीत, गच्चीत पाणी ठेवा,” असं ट्वीट राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलंय.

राज्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचं सांगितलं. याची समस्या मुंबईकरांना भोगावी लागत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड येथे मोठ्याप्रमाणात उष्णतेमध्ये वाढ होऊ लागली. या भागामध्ये सध्या 36 अंश सेल्सिअसहून अधिक तापमान वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.

दुपारी घराबाहेर फिरू नका, असं आवाहन हवामान खात्यानं केलं. वाढत्या उन्हामुळे मोठा फटका बसला आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारने लहान मुलांना उन्हाळ्याची लवकरच सुट्टी देण्याबाबत सांगितलंय.

News Title – Raj Thackeray Demand To Government For Declaration Holiday In Heat Summer vacation

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट

श्रीकांत शिंदेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे म्हणाले…

‘माझं राहुल गांधींसोबत लग्न…’; ‘या’ महिला नेत्याचा मोठा खुलासा

नाशिककरांनो काळजी घ्या!; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला