श्रीकांत शिंदेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी अशी तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यांनी मोदींना याबाबत पत्र देखील लिहिलं आहे.

राऊत यांच्या आरोपांनंतर श्रीकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं.’काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर चांगला डॉक्टर बघावा आणि बिघडलेले मानसिक संतुलन ठीक करावे. त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू .’, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला होता.

“श्रीकांत शिंदेंना मोदींची हवा लागलीये”

आज (16 एप्रिल) राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.’बाळराजेंना लिहिता वाचता येतं. ते हाड वैद्य आहेत, त्यांनी कधी माणसांची की जनावरांची हाड तपासली, ते पाहा. मला जेव्हा न्यायालयाने सोडलं, तेव्हा जे निकाल पत्र दिलं आहे, ते त्यांनी वाचायला पाहिजे, मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्टिकोनाने कसं कोणाला अडकवलं जातं, हे बाळराजेंना कळेल.’, असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

इतकंच नाही तर आतापर्यंत श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 500 ते 600 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. अडीच वर्षातली जी काही उधळपट्टी आहे, ती 100 कोटींच्या वर असून सातपुते यांच्या तक्रारबाबत ते का बोलत नाहीत?, असा सवालही राऊत यांनी केला आहे.

500 ते 600 कोटी रुपये गोळा करण्यात आले

यावेळी संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे. श्रीकांत शिंदे यांना मोदींची हवा लागलीये. नुस्त इधर-उधर की बात करो, असं म्हणत राऊत यांनी टोला लगावला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असं सांगितलं.

आज आम्ही शिवसेनेचं मशाल गीत लोकांसमोर आणणार आहोत, पुढल्या काही दिवसात आमचा जाहीरनामा, वचननामा आम्ही प्रसिद्ध करू, असंही राऊतांनी (Sanjay Raut) सांगितलं आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

News Title –  Sanjay Raut on Shrikant Shinde