काळजी घ्या! ‘या’ शहरात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Weather Update | अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचे सावट सरल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ होत आहे. पाऊस पडल्यामुळे काही अंशी उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. आता पुन्हा एकदा राज्यात उष्णतेची लाट येणार आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाने 40 अंशाचा टप्पा पार केला आहे. तर, मुंबईत विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुंबईत पारा 39 वर पोहोचलाय. उष्णतेमुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. आज 16 एप्रिल रोजी तापमानात एका अंशाने घट होणार असली तरी उकड्याचा त्रास कायम असणार आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकरांनी घराबाहेर पडताना अधिकची काळजी घ्यावी. येथे उष्णता अधिक तीव्र जाणवणार आहे.

दुसरीकडे पुण्यातही उन्हाच्या झळा वाहत आहेत. येथे तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांत 40 च्या घरात कायम आहे. आजही तापमानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. किमान तापमानात मात्र 2 अंशाने घट होऊन ते 20 वर राहील. त्यामुळे हवामान विभागाने पुणे आणि मुंबईला हायअलर्ट दिला आहे. उन्हाचे चटके जास्त लागणार असल्याने, नागरिकांनी 11 ते 5 दरम्यान काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलंय.

विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेच्या लाटा

या दोन आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात (Mumbai Weather Update) अवकाळी पाऊस पडून गेला. येथे ढगाळ हवामानामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. पण, आता पावसाचे सावट पूर्णपणे टळले असून येथेही पुन्हा तापमानात वाढ होताना दिसून येत आहे.

विदर्भाचा पारा 39 वर गेला असून पुढील काही दिवसांत नागपुरातील तापमान 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 एप्रिलला 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज येथे एका अंशाच्या वाढीसह ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रही तापला

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत आहे. कोल्हापूरचा पारा 40 अंशांवर तर नाशिकमध्ये देखील तापमानात एका अंशाची वाढ होऊन तापमान 39 अंशांवर पोहोचलंय. आजही तापमानाची हिच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

News Title – Mumbai Weather Update