चंदा दो धंदा लो; या खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! संजय राऊत भ्रष्टाचारावरून कडाडले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut News l सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे ऍक्टिव मोडवर असल्याचे दिसत आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

संजय राऊतांनी पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी :

खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून मागणी केली आहे. या पत्रात मागणी केली आहे की, श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमांवर आतापर्यंत करण्यात आलेला खर्च व निधीचा स्रोत नेमका काय आहे ही माहिती सामान्य जनतेला मिळाली पाहिजे. तसेच श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे.

गेल्या कित्येक दिवसांपासून चालू असलेल्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यासाठी लागलेले कोट्यावधी रुपये ज्यांनी दिले ते दानशूर कोण नेमके कोण आहेत? ही माहिती नागरिकांना माहित असणे गरजेचं असल्याचं खासदार संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच धर्मदाय आयुक्तांनी देखील या संदर्भात चौकशी करावी अशी तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुक्त्यांकडे केली आहे. मात्र तब्बल एक महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही.

चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात सुरु :

यासंदर्भात माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे. तसेच संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, चंदा दो धंदा लो हा खेळ राज्यात देखील सुरू आहे. मात्र या खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! आहेत.

श्रीकांत शिंदे फाउंडेशन या सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जनतेकडून वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारे नेमके कोण आहेत? असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

News Title – Sanjay Raut Against On Shrikant Shinde

महत्त्वाच्या बातम्या –

तो आला, त्याने RCB च्या गोलंदाजांना धु धु धुतले; झळकावले सर्वात जलद शतक

मोठी बातमी! अखेर सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक

या राशीच्या व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होतील

“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

200 रूपये देतो सांगून प्रचाराला आणलं पण पैसेच दिले नाही; ‘त्या’ व्हिडीओने खळबळ