केकेआर संघ संजू सॅमसनच्या यशस्वी रथाला मागे खेचणार का? आज रंगणार RR vs KKR

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RR vs KKR Playing XI l आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचे 6 सामन्यांत 10 गुण आहेत. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचे 5 सामन्यात 8 गुण आहेत. श्रेयस अय्यरचा संघ राजस्थान रॉयल्सला पराभूत करण्यात यशस्वी ठरल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानावर येईल. मात्र या सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कशी असेल? हे जाणून घेऊयात…

RR vs KKR Playing XI l दोन्ही संघाने संभाव्य खेळाडू :

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य प्लेइंग 11 :

फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्सचे संभाव्य प्लेइंग 11 :

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि कुलदीप सेन.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असेल? :

KKR आणि राजस्थान यांच्यातील रोमांचक सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. केकेआरचे घरचे मैदान हे फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. कोलकात्याच्या या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो आणि जास्तीत जास्त धावा केल्या जातात.

ईडन गार्डन्स मैदानावर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 88 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 36 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी पाठलाग करणाऱ्या संघाने 52 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या मैदानावर अधिक प्रभावी ठरतो.

राजस्थान रॉयल्सची या मोसमातील कामगिरी अप्रतिम राहिली आहे. संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली आहे. चौथ्या क्रमांकावर खेळत असलेल्या रियान परागनेही यावर्षी खूप प्रभावित केले आहे. जोस बटलरने या स्पर्धेत शतक झळकावले आहे. त्याचवेळी शेवटच्या गेममध्ये फिनिशर म्हणून शिमरॉन हेटमायरची कामगिरी अतुलनीय होती.

News Title – RR vs KKR Playing XI

महत्त्वाच्या बातम्या –

चंदा दो धंदा लो; या खेळाचे सूत्रधार मिंधेसरकारचे बाळराजे! संजय राऊत भ्रष्टाचारावरून कडाडले

तो आला, त्याने RCB च्या गोलंदाजांना धु धु धुतले; झळकावले सर्वात जलद शतक

मोठी बातमी! अखेर सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक

या राशीच्या व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होतील

“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल