पुण्यावर पाणी टंचाईचं तीव्र सावट, ‘इतक्याच’ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | राज्यात विदर्भ तसंच इतर काही भागांत अवकाळी पाऊस पडून गेला आहे. त्यामुळे आता तापमानात पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. राज्यात उन्हाचा पारा आणखीनच तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात देखील काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाला. आता इथेही उन्हाचे चटके वाढू लागले आहेत.

अशात इथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 10.22 टीएमसी इतका अल्प पाणीसाठा शिल्लक आहे.

पुणेकरांनो पाणी जपून वापरा

त्यामुळे मे आणि जून या दोन महिन्यात पुण्यात पाण्याची टंचाई जाणवेल. शहराला खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधील पाण्याद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा हा 29.15 टीएमसी आहे.

पण, सध्या या धरणांमध्ये फक्त 10.22 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना (Pune News ) पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. हा पाणीसाठा अवघे दिवस टिकेल, अशी माहिती समोर आली आहे.

धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक

त्यामुळे अजून जून महिन्यात पाण्यासाठी वणवण होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आता पासूनच पाणी जपून वापरा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. मागेही काही दिवस पुण्यात पाणी कपात करण्यात आली होती.

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी (Pune News )हाल सोसावे लागत आहेत. उन्हात दैनंदिन कामात पाण्याचा अधिक वापर होतो. पण, पाणी कमी असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. आता धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने जून महिन्याची चिंता ओढावली आहे.

News Title – Pune News Water shortage