तो आला, त्याने RCB च्या गोलंदाजांना धु धु धुतले; झळकावले सर्वात जलद शतक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RCB vs SRH Travis Head Century l आयपीएल 2024 मध्ये अनेक मोठं मोठे रेकॉर्ड ब्रेक होताना दिसत आहेत. 30व्या सामन्यात आणखी एक मोठा विक्रम मोडीत निघाला आहे. सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आपल्या झंझावाती शतकासह 17 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 39 चेंडूत सनसनाटी शतक झळकावले आहे.

RCB vs SRH Travis Head Century l ट्रॅव्हिस हेडने गिलख्रिस्ट मागे टाकले :

ट्रॅव्हिस हेडने चिन्नास्वामी स्टेडियमवर तुफान फलंदाजी केली आहे. त्याने अवघ्या 41 चेंडूत 102 धावांची खेळी केली आहे. या तुफान खेळीत 9 चौकार आणि 8 सनसनाटी षटकारांचा समावेश होता. हेडने 39 चेंडूत शतक झळकावून गिलख्रिस्टचा विक्रम मोडला आहे. गिलख्रिस्टने 2008 मध्ये मुंबईविरुद्ध अवघ्या 42 चेंडूत शतक झळकावले होते. याशिवाय त्याने एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉरन यांचा 43 चेंडूत शतकाचा विक्रमही मोडला आहे.

ट्रॅव्हिस हेडचे 39 चेंडूतील शतक हे सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात वेगवान शतक आहे. 2017 मध्ये स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने हैदराबादकडून खेळताना केकेआरविरुद्ध स्फोटक शैली दाखवली होती. त्याने अवघ्या 43 चेंडूत शतक झळकावले घसरला आहे.

IPL च्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारे 5 फलंदाज :

आयपीएल 2024 मध्ये ट्रॅव्हिस हेडने तुफान फलंदाजी दाखवली आहे. त्याने मुंबईविरुद्ध धडाकेबाज सामन्यात शानदार अर्धशतक ठोकले होते. हैदराबाद संघाने त्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 277 धावा केल्या होत्या. यावेळीही हैदराबाद संघाने अवघ्या 15 षटकांत 200 धावांचा टप्पा पार केला आहे.

30 चेंडू- ख्रिस गेल विरुद्ध पुणे वॉरियर्स (2013)
37 चेंडू – युसूफ पठाण विरुद्ध मुंबई इंडियन्स (2010)
38 चेंडू – डेव्हिड मिलर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2013)
39 चेंडू- ट्रॅव्हिस हेड विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2024)
42 चेंडू – ॲडम गिलख्रिस्ट विरुद्ध मुंबई इंडियन्स (2008)

News Title – RCB vs SRH Travis Head Century

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! अखेर सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक

या राशीच्या व्यक्ती प्रेमप्रकरणात यशस्वी होतील

“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

200 रूपये देतो सांगून प्रचाराला आणलं पण पैसेच दिले नाही; ‘त्या’ व्हिडीओने खळबळ

‘मागच्या 10 वर्षांत जे झालं तो फक्त ट्रेलर होता…’; नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य