200 रूपये देतो सांगून प्रचाराला आणलं पण पैसेच दिले नाही; ‘त्या’ व्हिडीओने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

कोल्हापूर | आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीला (Vidarbha) सुरुवात होणार असून त्याकरिता आता अवघे 5 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलीये. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामुळे खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ कोल्हापूरमधील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. 200 रूपये देतो असं सांगत काही महिलांना प्रचार रॅलीला बोलावण्यात आलं. मात्र पैसे न दिल्याचा दावा महिलांनी व्हिडीओमध्ये केला आहे. (Kolhapur lok Sabha)

महिलांना 200 रूपये देतो असं सांगत प्रचार करण्यासाठी बोलवल्याचा दावा या महिलांनी व्हिडीओत केलाय. शक्तीप्रदर्शनासाठी बोलावलं. नंतर महिलांनी पैसे मागायला सुरूवात केल्यानं व्हिडीओत एक माणूस आताच पाचशे-सहाशे बायका पैसे घेऊन गेल्या असल्याचं सांगताना दिसत आहे.

काय होतं व्हिडीओत?

व्हिडीओ पाहिल्यास समजतं की, इतर महिलांच्या गळ्यामध्ये महायुतीच्या पक्षाचे पट्टे होते. म्हणावी अशी गर्दी झाली नसल्यानं आम्हाला पैसे दिले नसल्याचं आलेल्या महिलांचं म्हणणं आहे.

महिलांना 200 रूपयांचं अमिश दाखवून त्यांना बोलावण्यात आलं. महिलांनी आपल्यासोबत लहान मुलांना घेत फॉर्म भरण्याच्या ठिकाणी उपस्थिती दाखवली. मात्र काही महिलांना 200 रूपयांचं अमिश दाखवून एकही रूपया दिला नसल्याचं महिला सांगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

News Title – Kolhapur Lok Sabha In Mahayuti Fraud 2oo Rupees Offer To Women

महत्त्वाच्या बातम्या

गोळीबाराचं प्लॅनिंग कुठे झालं?, मोठी माहिती समोर

सलमान खान गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची पोस्ट व्हायरल, म्हणाल्या…

मुंबईच्या पराभवानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला झापलं, म्हणाला…

‘खोकेसम्राट, पलटीसम्राट असण्यापेक्षा..’, अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना डिवचलं

‘रोहित शर्मासाठी मी माझा जीव…’; प्रिती झिंटाचं मोठं वक्तव्य