‘खोकेसम्राट, पलटीसम्राट असण्यापेक्षा..’, अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना डिवचलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amol Kolhe | लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे?, असा सवाल करत कोल्हे राजीनामा द्यायला निघाले होते. त्यांना मीच थांबवलं होतं, असा दावाही अजित पवार यांनी केला होता.

यावर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते निवडणूक प्रचाराच्या रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी आढळराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी पुन्हा एकदा गेट वेल सून म्हणत पाटील यांना टोला लगावला. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यामुळे ते बऱ्याचदा एकमेकांवर टीका करताना दिसून येतात.

अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना डिवचलं

‘ज्याला नटसम्राट म्हणवता, त्यानेच इतिहासाला उजाळा दिला. मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटीसम्राट, खोकेसम्राट असलेलं चांगलं.’, असा सवाल करत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना डिवचलं. अमोल कोल्हे गावभेट दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील काळूस गावात आले होते. यावेळी त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला.

‘अजित दादा मोठे नेते आहेत. पण, मी जे काही केलं ते माझ्या स्वकर्तृत्वाने केलंय. माझे काका नटसम्राट नव्हते. अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा. मग त्यांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे’, असं देखील कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले.

“माझ्याकडे शिरुर मतदारसंघातली मायबाप जनता”

आताच्या काळात मेरे पास नेता है, मेरे पास पैसा है, सत्ता है, तुम्हारे पास क्या है?, असं म्हणतात. तर, मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है… तुम्हारे पास क्या है… हा जुना संवाद. मला सांगायचं आहे की, माझ्याकडे शिरुर मतदारसंघातली मायबाप जनता आहे, असंही कोल्हे (Amol Kolhe) यांनी म्हटलं.

यावेळी त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही खडेबोल सुनावले. मुळमुद्दे नसल्याने खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार सुरू आहे. आढळराव पाटील तेच करत आहेत, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. आता अजित पवार त्यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष राहील.

News Title : Amol Kolhe target Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

वारंवार थकवा येतोय?, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता अशू शकते; आहारात करा याचा समावेश

iPhone 15 वर मिळतंय तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स

राज्यात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा!

“सलमान भारतातील सर्वांत मोठा गँगस्टर, त्याने..”, ‘या’ अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ

सलमानच्या घराखाली फायरिंग करणारा ‘कालू’ नेमका कोण?, अचंबित करणारी माहिती समोर