वारंवार थकवा येतोय?, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता अशू शकते; आहारात करा याचा समावेश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vitamin B12 Deficiency | शरीरातील खनिजे आणि पोषक तत्वे कमी झाल्यास समतोल बिघडतो आणि व्यक्ती आजारी पडते. त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे शरीरातील पोषक तत्वे आणि प्रथिनांची कमतरता भरून निघेल. त्यातच आपल्या शरीरात अत्यंत महत्वाचं पोषक तत्व म्हणजे व्हिटॅमिन बी 12 आहे.याची कमतरता झाल्यास अनेक समस्या उद्भवतात.

याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स यासारख्या पदार्थांच्या समावेश असणे गरजेचे आहे. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर थकवा जाणवणे, दम किंवा धाप लागणे, भूक न लागणे किंवा भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात पुढील पदार्थांचा समावेश करु शकता.

व्हिटॅमिन बी 12 साठी हे पदार्थ खा

अंडी : अंड्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. अंड्यातील पिवळे बलक हे व्हिटॅमिन बी 12 चे समृद्ध स्त्रोत आहे. यासोबतच कन, टर्की, ऑइली मासे, खेकडे यात देखील व्हिटॅमिन बी 12 भरपूर असते.

मासे : सॅल्मन, ट्यूना या सारख्या माशांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यामुळे या माशांचा आहारात समावेश करावा. यामुळे ही समस्या दूर होईल.

मांस : जर तुम्ही मांसाहारी असाल तर, व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12 Deficiency) ची कमतरता खूप लवकर पूर्ण होईल. तुम्ही मटण, चिकन खाऊ शकता. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण एनिमल प्रोडक्ट मध्ये जास्त असते.

दुग्धजन्य पदार्थ : शाकाहीर असाल आणि मांस, अंडी यांचा आहारात समावेश करता येत नाही. अशात तुम्ही दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. तो चांगला पर्याय आहे. आहारात दूध, चीज आणि ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केल्यास शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून निघेल.

ओट्स : ओटमील हे व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12 Deficiency) चा चांगला स्रोत आहे. ओटमील शिवाय, कॉर्नफ्लेक्स, ताक इत्यादींमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते.

हिरव्या भाज्या : हिरव्या पालेभाज्या व्हिटॅमिन बी12 चा उत्तम स्त्रोत आहेत.हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहाल. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी12 असते, यासोबत शरीराला आवश्यक खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात.

News Title :  Vitamin B12 Deficiency

महत्त्वाच्या बातम्या-

‘असे’ गैरसमज पाळाल तर सर्वांसमोर कायम हसूच होईल!

वरुण धवनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

मारुती सुझुकी लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार; ग्राहकांना मिळणार भन्नाट फीचर्स

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल