वरुण धवनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Varun Dhawan Baby John Movie l बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि कीर्ती सुरेश स्टारर ॲक्शन फिल्म बेबी जॉनच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र या चित्रपटाच्या रिलीजसाठी वरुणच्या चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार असल्याचं दिसत आहे.

Varun Dhawan Baby John Movie l या कारणामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येणार :

मिळालेल्या माहितीनुसार, वरुणच्या बेबी जॉन चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी हा चित्रपट 31 मे 2024 ला प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाची निर्मिती आणि पोस्ट-प्रॉडक्शनचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून 10-12 दिवस लागणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच आता हा चित्रपट जून किंवा जुलै 2024 मध्ये प्रदर्शित करू शकतात.

या चित्रपटात वरुण धवनशिवाय कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती मुराद खेतानी, प्रिया ऍटली आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. याशिवाय हा अभिनेता हॉलिवूड मालिका ‘सिटाडेल’मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे.

कल्की 2898 AD या चित्रपटाचा मार्ग मोकळा :

अशातच आता सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की, वरुणच्या चित्रपटाची जागा आता प्रभास आणि दीपिका पदुकोणचा कल्की 2898 AD घेऊ शकतील. तसेच बेबी जॉन चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याने बहुप्रतिक्षित कल्की 2898 AD या चित्रपटासाठी मार्ग तयार झाला आहे.

प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन स्टारर सायन्स फिक्शन चित्रपट कल्की 2898 एडी रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे बजेट जवळपास 600 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

News Title – Varun Dhawan Baby John Movie

महत्त्वाच्या बातम्या

मारुती सुझुकी लवकरच बाजारात धुमाकूळ घालणार; ग्राहकांना मिळणार भन्नाट फीचर्स

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार