कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! रेल्वेमध्ये बंपर भरती सुरु; या तारखेपर्यंत करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Indian Railway Recruitment 2024 l भारतीय रेल्वेत नोकरी करणाऱ्या इच्छुक तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (RPSF) च्या सब-इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती संदर्भातील नोटीस 14 एप्रिल रोजी जारी करण्यात आली आहे.

या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात? :

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार आजपासून म्हणजेच सोमवार, 15 एप्रिल 2024 पासून अर्ज करू शकतात. तसेच पात्र आणि इच्छुक उमेदवार 14 मे 2024 अर्ज करू शकतात. नोंदणीसाठी सुमारे एक महिन्याचा अवधी दिला आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

RRB आणि RPF च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार rpf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे तब्बल 4660 पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 4208 पदे हवालदाराची तर उर्वरित 452 पदे उपनिरीक्षकांची आहेत.

Indian Railway Recruitment 2024 l शैक्षणिक पात्रता काय आहे?

उपनिरीक्षक पदावर काम करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. 10 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करू शकतात. उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे आणि कॉन्स्टेबल पदासाठी 18 ते 28 वर्षे आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, महिला उमेदवार आणि EBC श्रेणींसाठी फी 250 रुपये आहे. तसेच उपनिरीक्षक पदावर निवड झाल्यास वेतन 35,400 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे. तर कॉन्स्टेबल पदावर निवडल्यास मासिक वेतन 21,700 रुपये आहे. याशिवाय इतरही अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

News Title – Indian Railway Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?