या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- मानसिक अस्वास्थ्याला बळी पडू नका. गायन कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ अंक ६, शुभ रंग गुलाबी

वृषभ:- हौस पूर्ण करता येईल. मैत्रीचे संबंध जोडले जातील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. कलेचे आवड जोपासता येईल. मानसिक ताणतणाव दूर सारावा. शुभ अंक ५, शुभ रंग पोपटी

Today Horoscope l मिथुन:- आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. स्त्री वर्गापासून सावध राहावे. क्षणिक मोहाला बळी पडाल. अनाठायी खर्च केला जाईल. मनातील इच्छेला महत्त्व द्याल. शुभ अंक १, शुभ रंग जांभळा

कर्क:- मित्र परिवारात वाढ होईल. दिवस कामात व गडबडीत जाईल. सर्वांना आनंदाने आपलेसे कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. शुभ अंक ३, शुभ रंग नारंगी

सिंह:-कामातून मानाची जागा मिळवाल. उत्कृष्ट बोलण्याने इतरांचे मन जिंकून घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कलाकारांचा नाव लौकिक वाढेल. शुभ अंक १, शुभ रंग काळा

कन्या:- कला जोपासायला वेळ काढता येईल. धार्मिक कामात मदत कराल. विशाल दृष्टिकोन ठेवून वागाल. कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

तूळ:- जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणांवरून वाद संभवतो. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या व्यवसायात सबुरीने वागावे. अचानक धनलाभ संभवतो. शुभ अंक ८, शुभ रंग निळा

वृश्चिक:- एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपले मत शांतपणे मांडावे. सहकार्‍यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. प्रवासात सावधानता बाळगावी. शुभ अंक ४, शुभ रंग लाल

Today Horoscope l धनू:- लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. नातेवाईकांची मदत मिळेल. शुभ अंक, ७ शुभ रंग गुलाबी

मकर:- प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. तुमच्या छंदाचे कौतुक केले जाईल. गप्पा गोष्टी करण्यामध्ये गुंग व्हाल. सहवासातून नवीन संबंध दृढ होतील. शुभ अंक २. शुभ रंग पांढरा

कुंभ:- कौटुंबिक कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. क्षुल्लक गोष्टींवरून त्रागा करू नये. शुभ अंक ६, शुभ रंग जांभळा

मीन:- नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कलेची आवड जोपसाता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची आवड दर्शवाल. शुभ अंक ३, शुभ रंग पोपटी

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?

“अबकी बार गोळीबार सरकार”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“गृहमंत्री, मुख्यमंत्री तुम्ही कुठे आहात?”; विरोधकांनी सरकारला सुनावलं

सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर

‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं