सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?, मोठी अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Salman Khan Firing | अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळी मुंबई पोलिसांची ब्रांच तैनात झाली. याप्रकरणामुळे वांद्रे परिसर हादरून गेलं आहे. गोळीबार झाला तेव्हा सलमान खान हा घरात होता. सध्या मुंबई पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत. गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. (Salman Khan Firing)

सलमान खान (Salman Khan Firing) यांच्या घरावर गोळीबार (Salman Khan Firing) झाल्याप्रकरणी नुकतीच डीसीपी राज टिळक यांनी प्रतिक्रिया दिलीये. राज टिळक म्हणाले की, घटना ही सकाळी पहाटे 5 वाजता घडली. दुचाकीवर दोघेजण होते. गोळीबाराच्या 4-5 राऊंड झाल्या. त्या कोणाच्या होत्या हे अद्यापही समजू शकलं नाही. आरोपींना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आलीत. (Salman Khan Firing)

हवेत गोळीबार करण्यात आला. मात्र तो गोळीबार कोणत्या टोळीनं केला हे माहिती नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 15 ते 20 पोलिसांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. गोळीबार झालेल्या वेळी सलमान खान हा घरातच असल्याचं समजतंय.

गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात?

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला धमकीचे मेलद्वारे मेसेजेस येत आहेत. त्याला काही दिवसांआधीच मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांआधी सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईनं जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं पुन्हा एकदा लॉरेंन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं आहे. पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली. त्यामध्येही बिश्नोईचा हात होता. सिद्धू  मुसेवालानंतर आता सलमान खान आपल्या निशाण्यावर असणार आहे असं स्वत: बिश्नोई म्हणाला होता. दरम्यान सलमानच्या घरावर झालेला गोळीबार हा लॉरेंन्स बिश्नोई यांनी केला का? याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.

News Title – Salman Khan Firing  News Police Update

महत्त्वाच्या बातम्या

‘अशा’ पुरूषांनी महिलांपासून चार हात लांब राहावं

युजवेंद्र चहलला पर्पल कॅप मिळूनही धोका?, कारण आलं समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गॅस सिलेंडरबाबत केली सर्वात मोठी घोषणा!

KKR चा संघ लखनौला रोखणार का? दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार

आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार लढत!