युजवेंद्र चहलला पर्पल कॅप मिळूनही धोका?, कारण आलं समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | देशात आय़पीएलचा 2024 (IPL 2024) हंगाम सुरू आहे. क्रिकेट रसिक या आयपीएलचा (IPL 2024) आनंद घेत आहेत. काल झालेल्या आयपीएलमधील 27 वा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा युजवेंद्र चहलने चांगली कामगिरी केलीय. मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या माथ्यावरील पर्पल कॅप युजवेंद्र चहलने खेचून आणली आहे. मात्र ती पर्पल कॅप धोक्यात येण्याची शक्यता आहे. ती पुन्हा चहलच्या माथ्यावरून निघू शकते. (IPL 2024)

चहलने केलं बुमराहला ओव्हरटेक

चहलने किंग्जविरोधात 4 षटकं टाकले असून केवळ 1 गडी बाद केलाय आणि 32 धावा दिल्या आहेत. एक विकेट घेताच चहल पर्पल कॅपचा मानकरी ठरलाय. चहल आणि बुमराह यांच्या विकेट्स एकसारख्या होत्या. मात्र इकॉनॉमी रेटनं बुमराह पुढं असल्याने बुमराहला पर्पल कॅप देण्यात आली होती. मात्र आता चहलने पुन्हा एक किंग्ज पंजाबचा गडी बाद करत पुन्हा पर्पल कॅप मिळवली आहे. (IPL 2024)

चहलची पर्पल कॅप धोक्यात?

युजवेंद्र चहलने 6 सामन्यात 22 षटकं टाकत 163 धावा देत 11 विकेट्स घेतल्यात. तर दुसऱ्या क्रमांकावर पर्पल कॅपच्या शर्यतीतल मुंबई इंडियन्स संघाचा बुमराह आहे. 5 सामन्यात 20 षटकं फेकत 119 आणि10 गडी बाद केलेत. रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सामना आहे. यामध्ये पुन्हा एकदा युजवेंद्रची पर्पल कॅप धोक्यात आहे. कारण जसप्रीत बुरमराहने विकेट्स घेतल्यानंतर चहलची पर्पल कॅप पुन्हा बुहमराकडे जाण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

News Title – IPL 2024 Yuzvendra Chahal Overtake To Jasprit Bumrah Purple Cap

महत्त्वाच्या बातम्या

प्रत्येक नागिरकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहित असायलाच हव्या!

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरन हेटमायर; राजस्थानचा रॉयल विजय

अत्यंत धक्कादायक! सलमान खानच्या घराबाहेर झाडल्या गोळ्या; नेमकं पुढं काय घडलं

या राशीच्या व्यक्तीने प्रवास करणे टाळावा; अन्यथा वाईट घटना घडण्याची शक्यता

“अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला”