Dharashiv Lok Sabha | धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी अजित दादांच्या सांगण्यावरून आम्ही भाजपमध्ये आलो असल्याचा खुलासा केला. त्यावरून आता ठाकरे गटाच्या उमेदवारानं अजित दादांना सवाल केलाय.
ओमराजे निंबाळकर यांचा सवाल
काल धाराशिव (Dharashiv Lok Sabha) य़ेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी अजित पवार यांच्या सांगण्यावरून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा केला. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडायचे षडयंत्र चालू होते का? असा थेट अजित पवार यांना सवाल केलाय.
“अजितदादांच्या सहमतीने भाजपमध्ये आलोय”
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना तिकीट देण्यात आलंय. त्यांचाच मुलगा मल्हार पाटील यांनी, “आम्ही 2019 मध्ये राष्ट्रवादी सोडून मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अजितदादांच्या सहमतीने भाजपमध्ये आलोय. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला पाठवलं आणि मग ते भाजपमध्ये आले,” असं मल्हार पाटील म्हणालेत.
“तुम्ही चिंता करू नका. आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण आहे. आम्ही महायुतीचं काम ताकदीनं करून महायुतीचं काम मतदारसंघात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही,” त्यावरून आता ओमराजे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय.
मल्हार पाटील यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून ओमराजे यांनी अजित पवार यांना सवाल केलाय. यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातलं वातावरण तापण्याची शक्यता आहे. ओमराजे यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये तगडी फाईट होणार आहे. अजित पवार गटाकडून धाराशिव मतदारसंघात अर्चना पाटील निवडणूक लढवणार आहेत. तर ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटातून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आलीये. दोन्ही उमेदवार एकमेकांवर भारी पडतील, अशी चर्चा आहे.
News Title – Dharashiv Lok Sabha In Big Twist Between Malhar Patil And Omraje Nimbalkar
महत्त्वाच्या बातम्या
पत्नीसह 9 महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या, कारण वाचून उडेल थरकाप
सोनं गाठणार 75 हजारांचा टप्पा?, इतक्या वधारल्या किंमती
“गादीचा आदर तसूभर…”, छत्रपती उदयनराजेंचं नाव घेत किरण माने स्पष्टच बोलले
सुजय विखे पाटलांची डिग्री बोगस?; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे नगरमध्ये खळबळ
सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा घेणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं