सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा घेणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचारसभा घेणार काय?, असा प्रश्न कार्यकर्त्यांसह सर्वांनाच पडला आहे. यावरच आज (13 एप्रिल) राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार का?, असा सवाल केला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘मी सकारात्मक आहे. पण अजून काही ठरवलेलं नाही. कुठे प्रचार सभा घ्यायची, कुठे नाही. पुढे बघू, आमच्या बुकींग असतात. त्यामुळे सभा होतात.’

“संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम…”

तसंच पुढे ते म्हणाले (Raj Thackeray) की, “महायुतीमधील लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा कुणाशी बोलायचं आणि पुढे कशाप्रकारचं जायचं त्याची यादी दोन दिवसात तयार होईल. त्यांच्यापर्यंत जाईल. आमचेही पदाधिकारी असतील त्यांना योग्य मानाने वागवतील अशी अपेक्षा आहे. कुणाशी संपर्क साधायचा याचा घोळ नको म्हणून यादी देऊ. त्यांनाही सोयीस्कर जाईल. पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. पूर्ण प्रचार करायचा आहे. संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल.”

दरम्यान, मनसे आपल्या कार्यकर्त्यांची यादी दोन दिवसांत जाहीर करणार आहे. अशात ते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करणार काय?, असाही प्रश्न आता निर्माण होतो आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरमध्ये अर्ज ठाकरे यांचाही फोटो दिसून आल्याने याचीही चर्चा रंगली आहे. सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याशी लढा होईल.

भाजपाला पाठिंबा देण्यामागील कारण समोर

यावेळी राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला, याबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत बरेच महत्त्वाचे विषय मार्गी लागले. यावेळी त्यांनी राम मंदीराबाबत देखील भाष्य केलं.नरेंद्र मोदींमुळे आज राम मंदीराचं काम पूर्ण झालं. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्ष त्यांना संधी द्यावी, असं आपणास आणि पक्षाला वाटलं, आणि म्हणून मनसेने महायुतीला पाठिंबा दिला, असं यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

“मी अनेक वेळा पंतप्रधान यांच्या धोरणांचा विरोध सुद्धा केला. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मला असं वाटतं की, मोदींना पुन्हा एकदा एक संधी देणं गरजेचं आहे. म्हणूच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रासाठी आपल्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जाणार आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संरक्षण, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा विषय आहे.”, असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.

News Title :  Will MNS Chief Raj Thackeray Conduct Rally For Mahayuti

“…तर राम मंदीर उभारलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरुन कौतूक

वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?

तुमचा मित्र तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर

कमी बजेटवाल्यांसाठी आनंदाची बातमी; भन्नाट फीचर्ससह Infinix Note 40 Pro 5G सीरीज लाँच