फिट अँड फाईन लाईफस्टाइलसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Healthy Lifestyle tips | निरोगी राहण्यासाठी योग्य आहारासोबतच आरोग्यदायी सवयीही महत्त्वाच्या आहेत. तुम्हालाही तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. आता या सवयी कोणत्या याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘या’ टिप्स फॉलो करा

सकाळी लवकर उठणे : पहाटे 4 ते 5 ही ब्रह्म मुहूर्ताची वेळ मानली जाते. या वेळी, तुम्ही उगवत्या सूर्याचे सुंदर दृश्यच पाहू शकता. यासोबतच ते तुम्हाला भरपूर ऊर्जा देखील देते.सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. सूर्यप्रकाशात बसल्यास तुम्हाला विटामीन डी मिळते.

ध्यान आणि ध्येय : सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट (Healthy Lifestyle tips म्हणजे शांत बसून ध्यान करा. आयुष्यात स्वतःसाठी एक ध्येय तयार करा आणि पुढे काय करायचे याची योजना करा. हे तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करण्यात मदत करेल, तसेच तुम्हाला टॉनिकप्रमाणे दैनंदिन ऊर्जा देखील देईल.

मॉर्निंग वॉक आणि व्यायाम : मॉर्निंग वॉक आणि मेडिटेशननंतरचा व्यायाम म्हणजे शरीराला पोषण देण्यासारखे आहे. असे केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटते. त्यामुळे रोज व्यायाम करा.सकाळी बाहेर फिरा. स्वच्छ हवेत बसा.

पौष्टिक नाश्ता : सकळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा प्रदान करत असतो. त्यामुळे (Healthy Lifestyle tips)न खाता घराबाहेर पडू नका. नाश्तामध्ये तुम्ही पौष्टिक आहार घ्या. यामुळे ऊर्जा निर्माण होईल. सकाळचा नाश्ता खूप संतुलित आणि आरोग्यदायी असावा, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.

हायड्रेशनची काळजी घ्या : उन्हाळ्यात शरीराला (Healthy Lifestyle tips) हायड्रेट न ठेवल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे रोज सात ते आठ ग्लास पाणी प्या. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.
यासोबतच भरपूर पाणी असलेले काकडी, टरबूज याचे सेवन करा.

डिजिटल ब्रेक आवश्यक : डोळे आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी लॅपटॉप किंवा मोबाइलपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. लॅपटॉप किंवा मोबाईलवर सतत काम करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे दररोज प्रत्येक तासाला ब्रेक घ्या.

News Title- Healthy Lifestyle tips

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल