या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष :- तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल. शुभ रंग लाल, शुभ अंक ४

वृषभ:- मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी. शुभ रंग पांढरा, शुभ अंक १

मिथुन:- स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. शुभ रंग जांभळा. शुभ अंक ७

Today Horoscope l कर्क :- उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ९

सिंह :- आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ४

कन्या:- मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ६

तूळ:- जवळची व्यक्ति भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक १

वृश्चिक:- कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. शुभ रंग काळा, शुभ अंक ८

धनू :- अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक २

मकर:- जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो. शुभ रंग निळा, शुभ अंक ५

Today Horoscope l कुंभ :- जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ६

मीन:- व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ९

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या : 

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, उचललं मोठं पाऊल

आरसीबी विरुद्ध विकेट्सचा ‘पंच’, बूमराहने पटकावली पर्पल कॅप

11 अफेअर्स करत विवाह न करता अभिनेत्री झाली आई, कारण आलं समोर

विराटकडे असलेली ऑरेंज कॅप ‘या’ खेळाडुकडे जाणार?, टॉप 5 मध्ये कोण?