विराटकडे असलेली ऑरेंज कॅप ‘या’ खेळाडुकडे जाणार?, टॉप 5 मध्ये कोण?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Orange Cap | आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 वा सामना काल (12 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला गेला. मुंबई इंडियन्सने गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 7 गडी राखून शानदार विजय मिळविला.

या सामन्यात मुंबईचा जसप्रीत बुमराह विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने आरसीबीचे 5 विकेट्स घेतले. बूमराहच्या या कामगिरमुळे तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीला 200 पार मजल मारता आली नाही. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 27 बॉल राखून 3 विकेट्स गमावून 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

आता पर्प कॅप तर बूमराहला मिळाली पण ऑरेंज कॅप सध्या कुणाकडे आहे?, कालच्या सामन्यात बूमराहने विराटला अवघ्या 3 धावांवर आऊट करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे विराटच्या खेळीला 3 धावांवर ब्रेक लागला. पण, अवघ्या 3 धावांवर आऊट होऊनही ऑरेंज कॅप विराटने स्वतःकडे कायम राखण्यात यश मिळवलंय. त्याने आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे.

टॉप 5 मधील खेळाडू कोण?

सध्या आरसीबीचा विराट कोहली याने 6 सामन्यात 319 धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली आहे. यानंतर रियान पराग 5 सामन्यातील 261 धावांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल 6 सामन्यांमध्ये 255 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, संजू सॅमसन याने 4 मॅचमध्ये 246 रन्स केल्या आहेत. तर साई सुदर्शन याने 6 मॅचमध्ये 226 धावा केल्या आहेत. यांच्यात सध्या ऑरेंज कॅपसाठी चढाओढ आहे.

MI vs RCB प्लेइंग ईलेव्हन

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

News Title : IPL 2024 Orange Cap Holder Highest Run Scorer Ranking

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?

“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला

प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!