आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | 11 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांमध्ये सामना होणार आहे. याच सामन्याच्या एका दिवसापूर्वी रात्री सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्स संघाचा सहमालक आकाश अंबानी एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत.

मुंबई इंडियन्स संघाचे सहमालक आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे एकाच गाडीतून प्रवास करत होते. यामुळे आता चर्चांना तोंड फुटलंय. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार पदावरून हटवण्यात आलं. त्याची जागा पांड्यानं घेतली. यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) संघ सोडणार असल्याच्या चर्चा समोर आल्या.

मुंबई इंडियन्स संघाच्या आयपीएलची सुरूवातच चांगली झाली नाही. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आलं. मात्र आता मुंबई इंडियन्स संघाच्या पडद्यामागे अनोख्या गोष्टी घडताना दिसत आहेत.

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास

रोहित शर्माचं कर्णधार पद काढून घेतल्यानंतर रोहित शर्मा नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात खेळाप्रती एकमत नसल्याच्या चर्चा होत्या. यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहिल्यास लक्षात येतं की आकाश अंबानी आणि रोहित शर्मा एकाच गाडीने प्रवास करत आहेत.

रोहित शर्मा हा फ्रंट सिटवर बसला आहे. सर्व पापराजींनी फोटो घेण्यासाठी हट्ट केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. त्यावेळी व्हिडीओमध्ये रोहित आणि आकाश एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. त्या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा आहे. आकाश रोहितची मनधरणी तर करत नसेल ना? असा प्रसंग याआधी कोणत्याच खेळाडूंसोबत घडलेला पाहायला मिळाला नाही.

रोहितची कामगिरी

रोहितचे सध्या आयपीएल 2024 हंगामात एकही शतक नाही. रोहितने चार सामन्यांमध्ये 118 धावा केल्या आहेत. दरम्यान एक अर्धशतक होता होता राहिलं. दिल्लीविरोधात रोहितनं 49 धावा केल्या असून 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहेत.

News Title – Rohit Sharma Travelling With Akash Ambani

महत्त्वाच्या बातम्या

आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे काढायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली