आज हार्दिक पांडयाची सेना RCB ला देणार टक्कर; पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MI vs RCB Head-To-Head Record l आयपीएल 2024 च्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन बनलेला संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे. गेल्या सामन्यात आरसीबी संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता आज वानखेडे स्टेडिअमवर 11 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घेऊयात वानखेडेची खेळपट्टी कशी आहे.

वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे? :

मुंबई आणि RCB (MI vs RCB) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 11 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळवला जाणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. तसेच हे मैदान फलंदाजांची योग्य मानले जाते. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात या मैदानावर झालेल्या शेवटच्या सामन्यात मुंबईने फलंदाजी करताना 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ केवळ 205 धावा करू शकला आणि मुंबईने 29 धावांनी विजय मिळवला होता.

वानखेडे स्टेडियमवर एकूण 187 सामने खेळले गेले आहेत. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर वानखेडे स्टेडियमवर एकूण 111 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये यजमान संघाने 63 वेळा विजय मिळवला, तर पाहुण्या संघाने 48 सामने जिंकले आहेत.

MI vs RCB Head-To-Head Record l वानखेडे स्टेडियमवर खेळलेले शेवटचे 5 आयपीएल सामने :

खेळलेले सामने : 5
प्रथम फलंदाजी करणारा संघ – 2
नंतर फलंदाजीसाठी संघ – 3
पहिल्या डावाची सरासरी -194
प्रथम फलंदाजी करताना सर्वोच्च धावसंख्या- पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (214)

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये एकूण 34 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्सने 20 सामने जिंकले, तर आरसीबीला 14 सामन्यांमध्ये विजयाचा सामना करावा लागला आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार :

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

News Title : MI vs RCB Head-To-Head Record

महत्त्वाच्या बातम्या –

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे वापरायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली

‘…म्हणून बोलणी फिसकटली’; भाजप-शिवसेनेकडून मोठा खुलासा