या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Today Horoscope l मेष:- भावनिक गोंधळ वाढवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आज कामात फार मोठे बादल करू नका. उद्दीष्ट ठरवून ठेवा. शुभ रंग निळा, शुभ अंक १

वृषभ:- तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक अडचण दूर होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल. शुभ रंग विटकरी, शुभ अंक ६

मिथुन:- कामातील दिरंगाई टाळावी. काही कामे चातुर्याने करावी लागतील. वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. हटवादीपणा करून चालणार नाही. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ५

कर्क:- प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही. मनातील इच्छेसाठी आग्रही राहाल. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. थोडीफार कसरत करावी लागू शकते. घरात नातेवाईकांची ऊठबस राहील. शुभ रंग नारंगी, शुभ अंक १

सिंह:- स्वत:साठी थोडा वेळ काढावा. व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतून पडाल.अचानक धनलाभ होऊ शकतो. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ७

Today Horoscope l कन्या:- कामात चातुर्य दाखवावे लागेल. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. दिवस भटकंतीत घालवाल. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ३

तूळ:- मनोबल वाढवावे लागेल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. शुभ रंग काळा, शुभ अंक ५

वृश्चिक:- बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. हेकटपणे वागून चालणार नाही. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी. शुभ रंग जांभळा, शुभ अंक २

धनू:- जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक गोष्टी येणार्‍या वेळेवर सोडाव्या. संपर्कातील लोक भेटतील. मनाची द्विधावस्था दूर ठेवा. शुभ रंग हिरवा, शुभ अंक ९

Today Horoscope l मकर:- सरळ मार्गी जमेल तेवढे करावे. मनातील इच्छेला प्राधान्य द्या. हातातील कामात यश येईल. नव्या उर्जेने कामे कराल. प्रेमप्रकरणाला उभारी मिळेल. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक २

कुंभ:- संमिश्रतेचा ताण कमी होईल. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. उत्तम वाहन सौख्य मिळेल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल. शुभ रंग लाल, शुभ अंक ६

Today Horoscope l मीन:- जोमाने नवीन काम हातात घ्याल. परोपकाराची भावना जागृत ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवा. श्रम व दगदग वाढेल. शुभ रंग पांढरा, शुभ अंक ३

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या –

तुमच्याही चिमुकल्याला रात्री दूध पिण्याची सवय आहे तर वेळीच सावध व्हा!

तरुणांच्या आवडत्या Bajaj Plusar N250 बाईकच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत

“मी तोंड उघडलं तर…”, अजित पवारांचा कुटुंबातील व्यक्तींना इशारा

एप्रिलमध्ये आहे चैत्र विनायक चतुर्थी; जाणून घ्या पूजेची शुभ वेळ आणि तारीख

पुढील चार दिवस ‘असं’ राहील वातावरण; हवामान विभागाचा अंदाज