पुढील चार दिवस ‘असं’ राहील वातावरण; हवामान विभागाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | राज्यात विविध भागांमध्ये पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. काल (9 एप्रिल) विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली.  गारपीट झाल्याने भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला व बुलढाणा शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यासह अनेक भागात गारपीटीसह वादळी वाऱ्याच्या पाऊस झाला. यामुळे संत्रा,  कांदा, गहू पिकासह अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं.

‘या’ भागांना अवकाळीने झोडपलं

या भागामधील गावात घरांची मोठी पडझडदेखील झाली. भंडारा जिल्ह्यातही विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. तापमान वाढल्याने येथे उकाडा खूप वाढला होता. आता पाऊस पडून गेल्याने येथे वातावरण थोडं थंड झालं आहे. त्यामुळे उष्णतेपासून थोडा फार दिलासा मिळाला आहे. पण, शेतीचं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यात देखील हीच स्थिती पाहावयास मिळाली.

हवामान विभागाने (Weather Update ) आता पुढील चार ते पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे उन्हाळी भात पिकाला फायदा झाला. पण, इतर पिकांचं नुकसान झालं आहे. पावसाने शेतातील रब्बी ज्वारी, कांदा या पिकांसह फळ बागेचं देखील मोठं नुकसान केलंय.

पुढील चार दिवस पावसाचे

जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मका, बाजरी, ज्वारी काढणीला आलेले अनेक पीक जमीन दोस्त झाले. बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. आता नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, कोकण आणि गोव्यात (Weather Update ) पुढील पाच दिवस हवामान कोरडं राहील. तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, सांगली व सोलापूर येथे 11 व 12 तारखेला व मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

News Title- Weather Update in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना

या राशीच्या व्यक्तींनी बाहेरगावी जाताना काळजी घ्यावी

मोठी बातमी! फक्त मोदींसाठी राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्त पाठिंबा