OnePlus चा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

OnePlus Nord CE 3 Lite 5G | कमी बजेटमध्ये जबरदस्त फीचर्सवाला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. वनप्लसचा स्मार्टफोन कंपनीने स्वस्त केला आहे. त्यावर बँकेच्या काही ऑफर्सही ठेवण्यात आल्या आहेत. या दरम्यान, खरेदी करण्यावर तुम्हाला काही सूटदेखील दिली जाईल.

वनप्लसचा लेटेस्ट स्मार्ट फोन लॉन्च होऊन काही महिनेच झाले असताना कंपनीने ही ऑफर जारी केली आहे. हा फोन वनप्लसचा लेटेस्ट Nord CE 3 Lite 5G आहे. लॉन्चच्या वेळी फोनची किंमत 19,999 रुपये होती. पण आता खरेदी करणाऱ्यांना फक्त 17,999 रुपये मोजावे लागतील.

यासोबतच ग्राहकांना काही बँक ऑफर्सचाही लाभ मिळू शकतो. डील दरम्यान तुम्ही बँक ऑफरचा लाभ घेणार असाल तर फोनची वास्तविक किंमत आणखी कमी केली जाईल. हा फोन पेस्टल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रे कलरमध्ये मिळेल.

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्पेसिफिकेशन

डिस्प्ले : या 5G स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसोबत 6.72-इंचाचा IPS LCD आहे. याचा रिफ्रेश रेट 120hz, 550 nits ची टिपिकल आणि 680 nits चा पीक ब्राइटनेस आहे. त्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे.

चिपसेट आणि OS : फोनमध्ये (OnePlus Nord CE 3 Lite 5G) परफॉर्मेंससाठी क्वालकॉमचा Snapdragon 695 5G चा चिपसेट लावण्यात आला आहे, जो 6nmवर काम करतो. ऑक्टाकोर चिपसेटला Adreno 619 जीपीयूसोबत जोडण्यात आले आहे.फोन OxygenOS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.

बॅटरी- चार्जिंग : 67W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh ची बॅटरी फोनला देण्यात आली आहे. यामुळे फक्त 30 मिनिटमध्ये फोन 80 टक्के चार्ज होऊ शकतो.

कॅमेरा : (OnePlus Nord CE 3 Lite 5G) फोनमध्ये सेल्फीसाठी कंपनीने 1080p@30fps वाला 16MP चा सेंसर लावला आहे. याच्या बॅक पॅनलला एलईडी फ्लॅश यूनिटसोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

News Title- OnePlus Nord CE 3 Lite 5G phone has become cheaper

महत्त्वाच्या बातम्या-

ट्रकची भीषण धडक, गाडीचा चुराडा… नाना पटोलेंसोबत नेमकं काय काय घडलं?

नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात, तब्येतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना